Type Here to Get Search Results !

प्रसिद्ध उद्योजक व सॅपेरीटो पिझ्झाचे संचालक आनंद केशव यांच्या पुण्यातील खवय्यांसाठी चविष्ट सॅपेरीटो पिझ्झा आउटलेटच्या तिसऱ्या शाखेचे खराडी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखदार उद्घाटन संपन्न*

 


मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे

अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज


पुणे......


*प्रसिद्ध उद्योजक  व सॅपेरीटो पिझ्झाचे संचालक आनंद केशव यांच्या पुण्यातील खवय्यांसाठी  चविष्ट सॅपेरीटो पिझ्झा आउटलेटच्या तिसऱ्या शाखेचे खराडी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत  दिमाखदार उद्घाटन संपन्न*

पुणे -प्रसिद्ध उद्योजक व सॅपेरीटो पिझ्झाचे संचालक आनंद केशव यांच्या  पुण्यातील खवय्यांसाठी  चविष्ट सॅपेरीटो पिझ्झा या  आउटलेटच्या तिसऱ्या शाखेचे खराडी येथील झेन इस्टेट येथे 14 फेब्रुवारी 2024 रोजी विविध मान्यवरांच्या  उपस्थितीत फीत कापून दिमाखदार उद्घाटन संपन्न झाले . यावेळी समाजसेवक सुरेंद्र पठारे, भारतीय जनता पक्षाच्या ट्रेड सेलचे अध्यक्ष उमेश शाह, समाजसेवक व उद्योजक डॉ.शैलेश चौबे , विमान नगरच्या माजी नगरसेविका मुक्ता जगताप,रामचंद मेलवानी, ब्रँड अँबेसिडर मॉडेल व अभिनेते विशाल गोरे,सॅपेरीटो पिझ्झाचे संचालक आनंद केशव,अरविंद दंडगे,हिरेनचंद  लोढ़ा,हरचंद गिड़वानी,सुबोध भारद्वाज, ,अमृता केशव, अनन्या केशव,सृष्टी कुमार ,नाना आबनावे,सचिन चंदनशिवे,रोपम डे,अरविंद शर्मा,अरविंद परदेशी,निता बाजारिया,रवींद्र दास,आनंद कुमार, दिपक रवी आदी मान्यवर उपस्थित होते. सॅपेरीटो पिझ्झाचे ब्रँड अँबेसिडर मॉडेल व अभिनेते विशाल गोरे हे आहेत.व्हॅलेंटाईन डे च्या मुहूर्तावर अतिशय चविष्ट व लज्जतदार  सॅपेरीटो  पिझ्झाचा  खवय्यांना आस्वाद घेता येणार आहे. या पिझ्झावर एक खरेदी केल्यास एक पिझ्झा फ्री  व एका पिझ्झा वर 50 टक्के सूट अशी ऑफरही 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत सॅपेरीटो पिझ्झा कडून ठेवण्यात आली आहे.सॅपेरीटो पिझ्झा हा उद्योजक आनंद केशव यांचा  स्वतःचा ब्रँड असून वडगाव शेरी, लोकमान्य नगर -सदाशिव पेठ  व खराडी येथे तीन आउटलेट आहेत. तरी पुणेकर खवय्यांनी या आउटलेटला नक्की भेट द्यावी.

Post a Comment

0 Comments