मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज
दादा इदाते यांच्या उपस्थितीत मातंगऋषी साहित्य संमेलनाचा समारोप
पिंपरी : भटके विमुक्त जाती-जमाती केंद्रीय आयोगाचे माजी अध्यक्ष पद्मश्री कर्मवीर दादा इदाते यांच्या प्रमुख उपस्थितीत दुसऱ्या मातंगऋषी साहित्य संमेलनाचा समारोप झाला.
संमेलनानिमित्त पौराणिक व शिवकालीन शस्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. मातंग-शबरी काव्यकट्ट््यावर महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या कवींनी कवितांचे सादरीकरण केले. त्यानंतर डॉ. अविनाश सांगोलेकर यांच्या अध्यक्षतेखाली गझल मुशायरा आयोजित करण्यात आला होता. म. भा. चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन वैशाली माळी यांनी केले.
‘भारतीय संस्कृतीतील कालसंगत व विसंगत परंपरा' या विषयावर ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री रमेश पतंगे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. निलेश काटे यांच्यासह अनेक वक्त्यांचा सहभाग होता. विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तींचा अण्णा भाऊ साठे कार्यगौरव पुरस्कार तसेच साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे साहित्यरत्न पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
डॉ. अंबादास सकट लिखित आक्रांत आरक्षण विक्रांत योद्धा या पुस्तकाचा प्रा. विनोद सूर्यवंशी यांनी इंग्रजीत अनुवादित केलेल्या ‘बेलिगर्ड रिझर्वेशन ॲण्ड व्हिक्टोरिअस वॉरिअर' या पुस्तकाचे प्रकाशन रमेश पतंगे यांच्या हस्ते झाले.
या वेळी बोलताना दादा इदाते म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शिक्षणपद्धतीद्वारे देशाच्या संस्कृतीची विकृतपणे मांडणी केली गेली. धर्मसंस्कृती नष्ट होण्याच्या दृष्टीने प्रयत्नही झाले. पण यात यश आले नाही. राम जन्मभूमीमुळे देश पुन्हा एकसंघ झाला आहे. इदाते यांचा सन्मान संमेलनाध्यक्ष गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते करण्यात आला.


Post a Comment
0 Comments