Type Here to Get Search Results !

पत्रकार, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते यांच्यावर* *लाठीमार करणारे पोलीस निरीक्षक* *पांढरे यांना त्वरित निलंबित करा* - माजी आमदार मोहन जोशी

 


मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे

अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज


पुणे- शांततेने कार्यक्रम करणाऱ्या महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते आणि पत्रकार यांच्यावर नाहक लाठीमार करणारे चतुःश्रृंगी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बालाजी पांढरे यांना तातडीने निलंबित करावे, अशी मागणी माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे आज (शनिवारी) केली.


या शिष्टमंडळात आमदार रवींद्र धंगेकर, शिवसेना शहरप्रमुख गजानन थरकुडे, अभय छाजेड, संजय बालगुडे, विरेंद्र किराड, रमेश अय्यर, प्रथमेश आबनावे, प्रशांत सुरसे, चैतन्य पुरंदरे आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.



 *या प्रकाराची दखल घेऊन चौकशीसाठी समिती नेमत असून त्याचा अहवाल तीन दिवसांत येईल. त्यानुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पोलीस आयुक्तांनी शिष्टमंडळाला दिले.* 



या शिष्टमंडळात चेतन अगरवाल, सुरेश कांबळे, आयुब पठाण, किशोर मारणे, जयकुमार ठोंबरे, दीपक ओव्हाळ, गोरख पळसकर, ज्योती परदेशी, गणेश शेडगे, फैय्याज अन्सारी, महेंद्र चव्हाण, रवी रजपूत, मंगेश थोरवे, राजू नाणेकर, कान्होजी जेधे, बाबा सय्यद, प्रशांत मिठापल्ली, सचिन बहिरट, नितीन जाधव, शेखर थोपटे, प्रथमेश लभडे, साहिल राऊत, गोरख बाळंदे, राज गेहलोत, साहिल भिंगे, उमेश काची, मंदार लांजेकर, समीर गांधी, युवराज मदगे, हेरॉल्ड मेस्सी, रोहन जाधव, अक्षय पाटील-खांगटे आदींचा समावेश होता.


Mohan Joshi   Ravindra Dhangekar - रविंद्र धंगेकर Sanjay Balgude Abhay Chhajed 


#punepolice #punecity #pune #Shivajinagar #पत्रकार #पुढारी #pudhari  #पुणेपोलिस #पुणे #LowandOrder #reporter #निषेध

Post a Comment

0 Comments