Type Here to Get Search Results !

अखिल भारतीय भटके विमुक्त जाती-जमाती महासंघाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष आसिफ भाई खान यांनी सत्यशोधक बहुजन आघाडी युवकच्या बेमुदत उपोषणाला जाहीर पाठिंबा

 



मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज


दिनांक ०८/११/२०२३ रोजी सत्यशोधक बहुजन आघाडी पुणे शहर युवक आघाडीच्या वतीने व पुणे शहराध्यक्ष युवक आघाडी संभाजी म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली१) तु चांभार आहेस चांभाराने खाली बसुन चप्पल शिवायची असते तुला छत कशाला असे जातीवाचक वक्तव्य करुण कारवाई करणारे नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाचे अतिक्रमण निरीक्षक भिमाजी शिंदे यांना पाठीशी घालणारे परिमंडळ १ च्या उप आयुक्त (ढोलेपाटील रोड क्षेत्रीय कार्यालये पुणे) श्रीमती किशोरी शिंदे व अतिरिक्त आयुक्त श्री विकास ढाकणे यांची सखोल उच्चस्तरीय चौकशी करून निलंबनाची कार्यवाही करावी. २)जातीवादी भिमाजी शिंदे नगर रोड क्षेत्र कार्यालय यांना तर निलंबित करावे आणि त्यांचे अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना अनुमती द्यावी या मागणीसाठी पुणे महानगरपालिका गेट शेजारी बेमुदत उपोषण सुरु असून, अखिल भटके विमुक्त जाती-जमाती महासंघाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष आसिफ भाई खान यांनी व मा. शबिर नदाफ, अबिब भाई शेख, वशीम शेख व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पाठिंबा दर्शविला.तसेच लवकरात लवकर यांच्या मागण्या महानगरपालिकेने मान्य केल्या नाहीततर अखिल भटक्या विमुक्त जाती जमाती महासंघाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

Post a Comment

0 Comments