Type Here to Get Search Results !

विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोण ठेऊन स्टार्टअप सुरू करा भारतीय जी २०चे शेरपा व प्रशासकीय अधिकारी अभिताभ कांत यांचा सल्ला- एमआयटी डब्ल्यूपीयूचा ५था दीक्षांत समारंभ, ५१८० विद्यार्थ्यांना पदवी प्रदान

 

मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे

अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज


पुणे, ४ नोव्हेंबर: " पंतप्रधानांच्या नेतृत्वात डिजिटल इंडियाच्या दिशेने वाटचाल करतांना  विद्यार्थ्यांनी सरकारी नोकरीच्या मागे न लागता धोका पत्करून स्टार्टअप सुरू करावे. सकारात्मक दृष्टिकोनातून प्रत्येक आव्हानांचा सामना करावा. आजच्या काळात तंत्रज्ञान, संशोधन आणि शांती या तीन गोष्टी सर्वात महत्वाच्या आहेत.” असा सल्ला भारतीय जी २०चे शेरपा व प्रशासकीय अधिकारी अभिताभ कांत यांनी विद्यार्थ्यांना दिला. 

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचा पाचवा दीक्षांत समारंभ शनिवारी विश्व सभामंडप, विश्वराजबाग, लोणी-काळभोर, पुणे येथे पार पाडला.यावेळी विद्यापीठाच्या ५१८० विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.



विज्ञान क्षेत्रात आयुष्यभर केलेल्या अतुलनीय कार्याबद्दल प्रसिद्ध शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांना डॉ. विश्वनाथ दा कराड, अमिताभ कांत व राहुल कराड यांच्या हस्ते ‘एमआयटी डब्ल्यूपीयू विज्ञान महर्षी सन्मान’ देऊन गौरविण्यात आले. सन्मानपत्र, सरस्वतीची मुर्ती व ५ लक्ष रूपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप होते. 

यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, माईर्सच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश तु. कराड, प्रा. शरदचंद्र दराडे पाटील, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरु डॉ. आर.एम.चिटणीस, प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, कुलसचिव प्रा. गणेश पोकळे आणि परिक्षा नियंत्रक डॉ. शक्ती जी. मुरूगेसनर उपस्थित होते. तसेच विद्यापीठाचे अधिष्ठाता व संचालक उपस्थित होते.



या प्रसंगी सोमय्या बाजपेयी हिला ‘फाउंडर प्रेसिडेंट मेडल’ व अन्वेशा भट्टाचार्य हिला ‘एक्जीकेटीव्ह प्रेजिडेंट मेडल’ ने गौरविण्यात आले. तसेच ९२ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक, ३४ रौप्य आणि १४ कास्य पदक असे एकूण १४० विद्यार्थ्यांना मेडल बहाल करण्यात आले. तसेच १६ विद्यार्थ्यांना पी.एचडी देण्यात आली. यामध्ये ४२६ विद्यार्थी मेरीट लिस्ट मधील आहेत.

अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, व्यवस्थापन (यूजी व पीजी), लिबरल ऑर्टस, बीएड, फाइन ऑर्टस, मिडिया अ‍ॅण्ड पत्रकारिता, वाणिज्य, अर्थशास्त्र, विज्ञान,फॉर्मसी, सस्टेनेबल स्टडीज, डिझाइन, गर्व्हनन्स इ. शाखेत मिळून एकूण ५१८० विद्यार्थ्यांना यावेळी पदवी प्रदान करण्यात आली.

अभिताभ कांत म्हणाले," सध्या देशाची ३.५ ट्रीलियन डॉलर अर्थ व्यवस्था आहे. देश कॅशलेस आणि पेपरलेस होत असतांना डिजिटल पेमेंटच्या संख्येत वृध्दि होत आहे. वैज्ञानिक युगात एआयचा उपयोग मिलेट्री , पोलिस, ऑटोनॉमिक, शेती बरोबरच अन्य क्षेत्रात होत आहे. भविष्यात आरोग्य, न्यूट्रीशियन्स, स्पेस, सोलर या मध्ये मोठ्या व्यवसायाच्या संधी आहेत. तसेच भविष्यात ऊर्जा, डाटा सायन्स, पर्यावरण आणि शाश्वत विषय महत्वाचे असतील. परंतू या सर्व गोष्टीसाठी शांती महत्वाची आहे.”

डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले," दीक्षांत या शब्दाचा अर्थ शिक्षांत नाही तर आयुष्य भर विद्यार्थी राहून सतत शिकत रहावे. विज्ञानाशिवाय प्रगती होऊ शकत नाही त्यामुळे सतत संशोधन करत रहावे. विद्यार्थ्यांनी लक्ष्य मोठे ठेवणे, शांततेच्या मार्गाने कठीण परिश्रम करत रहाणे, आपल्या कामाचा उद्देश किंवा हेतू चांगले ठेवणे आणि आपले ध्येय साध्य करण्याची मर्यादा ठेवू नये. या गोष्टी लक्षात ठेवाव्या.”

डॉ. कराड म्हणाले,"भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्वज्ञान हे तत्व जीवनात शांती निर्माण करते. विद्यार्थ्यांनी शिस्त आणि वचनबद्धतेचे पालन करावे. भविष्यात सुख-समाधान आणि शांतीचा मार्ग दाखविण्याचे दायित्व भारताचे आहे. आज ज्या ऋषीतुल्य वैज्ञानिक डॉ. माशेलकर यांचा सत्कार झाला आहे ते रॉयल सोसायटी ऑफ लंडनचे सदस्य असलेले प्रथम भारतीय आहेत.”

 राहुल कराड म्हणाले," विद्यापीठातून मिळविलेले ज्ञान आणि कौशल्य तुमच्या जीवनाला भविष्यात नवा आकार देईल. लक्ष निर्धारित करून विद्यार्थ्यांनी शेतकरी आणि गरीबांसाठी सेवा दयावी.तसेच ग्रामिण विकास, सामाजिक संशोधन आणि कंपन्यासाठी आपल्या ज्ञानाचा वापर करावा. डॉ. कराड यांनी आयुष्य भर वसुधैव कुटुम्बकम तत्वाचे पालन करून ते खर्‍या अर्थाने पीस अ‍ॅम्बेसिडर आहेत.”

कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस यांनी प्रस्ताविक केले. प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. शक्ती जी. मुरूगेसनर यांनी आभार मानले. 




Post a Comment

0 Comments