मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज
*पुणे : दिनांक ०७ नोव्हेंबर २०२३* : वाडवडिलांकडून चालत आलेली दिवाळी सणाची परंपरा जोपासत ती पुढील पिढीकडे सुपूर्द करण्यात महिलांच्या दिवाळी फराळाचे विशेष महत्व आहे असे मत सुलभा सत्तुरवार यांनी व्यक्त केले. यशस्वी एकेडमी फॉर स्किल्स संस्थेच्यावतीने महाराष्ट्र कौशल्य विकास केंद्र, अमित गार्डन रेस्टारंट येथे आयोजित दिवाळी फराळ पाककृती स्पर्धेच्या समारोप सत्रात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, दिवाळी फराळातील सर्व पदार्थ योग्य पद्धतीने बनविणे हे महिलांसाठी बऱ्याचदा परीक्षा पाहणारेच ठरतात, विशेषतः चकली हा पदार्थ तर सुगरणींची फारच परीक्षा घेतो. मात्र पारंपरिक पदार्थांचे ठराविक मापदंड सांभाळतानाच त्यातही नावीन्यपूर्ण पद्धतीने दिवाळी फराळ पदार्थ तयार करणाऱ्या या स्पर्धेतील महिलांचे त्यांनी विशेष कौतुक केले.
यावेळी भारयीय विद्याभवन संस्थेच्या प्राध्यापिका अमृता वाघ यांचीही विशेष उपस्थिती होती. स्पर्धेतील विजयापेक्षा स्पर्धेत आपण तयार करणारा पदार्थ सादर करण्याचे धाडस आपल्यात नवा आत्मविश्वास निर्माण करतो असे यावेळी यशस्वी संस्थेच्या संचालिका स्मिता धुमाळ यांनी सांगितले.
यावेळी पौष्टिकता, नाविन्यता, रुचकरपणा व आकर्षकता अशा निकषांच्या आधारे परीक्षण करण्यात आले. या स्पर्धेत पारंपारिक पदार्थ प्रकारात प्रियांका पाटेकर व नाविन्यता प्रकारात नयना वाघ या दोन्ही स्पर्धक महिला प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्याबद्दल दोघींचा मानाची पैठणी देऊन सन्मान करण्यात आला. तर शोभा विजागत या द्वितीय क्रमांकाच्या व विद्या ताम्हणकर या तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या.
यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या यशस्वी संस्थेच्या विद्यार्थींनीनी तयार केलेल्या दिवाळी फराळ पदार्थ प्रदर्शनालाही उत्स्फूर्त नागरिकांचा प्रतिसाद लाभला. या उपक्रमासाठी संस्थेचे प्रशिक्षक गणेश साळवे, प्रसाद शाळीग्राम, प्रसाद महाडिक, वनराज मुऱ्हे,ओंकार भुवड आदींनी विशेष सहकार्य केले.
*फोटो ओळ*
*१)* यशस्वी एकेडमी फॉर स्किल्स संस्थेच्यावतीने आयोजित दिवाळी फराळ पाककृती स्पर्धेत पारंपरिक प्रकारात विजयी ठरलेल्या प्रियांका पाटेकर यांना मनाची पैठणी प्रदान करताना प्रमुख पाहुण्या सुलभा सत्तुरवार व 'यशस्वी' संस्थेच्या संचालिका स्मिता धुमाळ,भारतीय विद्याभवनच्या प्राध्यापिका अमृता वाघ,व संस्थेचे प्रशिक्षक गणेश साळवे.
*२)* यशस्वी एकेडमी फॉर स्किल्स संस्थेच्यावतीने आयोजित दिवाळी फराळ पाककृती स्पर्धेत नाविन्यता प्रकारात विजयी ठरलेल्या नयना वाघ यांना मनाची पैठणी प्रदान करताना प्रमुख पाहुण्या सुलभा सत्तुरवार व 'यशस्वी' संस्थेच्या संचालिका स्मिता धुमाळ,भारतीय विद्याभवनच्या प्राध्यापिका अमृता वाघ,व संस्थेचे प्रशिक्षक गणेश साळवे.
*३)* यशस्वी एकेडमी फॉर स्किल्स संस्थेच्यावतीने आयोजित दिवाळी फराळ पाककृती स्पर्धेतील विजेत्या स्पर्धक प्रियांका पाटेकर, नयना वाघ व शोभा विजागत यांच्यासमवेत कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सुलभा सत्तुरवार, 'यशस्वी' संस्थेच्या संचालिका स्मिता धुमाळ,भारतीय विद्याभवनच्या प्राध्यापिका अमृता वाघ.
*४)* यशस्वी एकेडमी फॉर स्किल्स संस्थेच्यावतीने आयोजित दिवाळी फराळ पाककृती स्पर्धेचे परीक्षण करताना कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सुलभा सत्तुरवार, 'यशस्वी' संस्थेच्या संचालिका स्मिता धुमाळ, भारतीय विद्याभवनच्या प्राध्यापिका अमृता वाघ.
*५)* यशस्वी एकेडमी फॉर स्किल्स संस्थेच्यावतीने आयोजित दिवाळी फराळ पाककृती स्पर्धेतील सहभागी सर्व सहभागी महिलांसमवेत कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सुलभा सत्तुरवार, 'यशस्वी' संस्थेच्या संचालिका स्मिता धुमाळ व भारतीय विद्याभवनच्या प्राध्यापिका अमृता वाघ.



Post a Comment
0 Comments