Type Here to Get Search Results !

डाॅ.मोहन कुलकर्णी यांना पीएचडी प्रधान*

 

मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे

अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज

By..Datta Hajare.....

पुणेः एमआयटी आर्ट,डिजाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणेच्या स्कुल ऑफ इंजिनिअरिंग व सायन्सचे प्राध्यापक डाॅ. मोहन मधुकर कुलकर्णी यांना मेकॅनिकल अभियांत्रिकी विषयात पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. 

मेक्यानिकल इंजिनिअरिंग मधील '*सोलर कॉन्सेंट्रेटिंग सिस्टम मधील अद्ययावत तंत्रज्ञान, त्याची पडताळणी व  आधुनिकीकरण*' हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. डाॅ. कुलकर्णी यांना या संशोधनासाठी एका सर्वोत्कृष्ट शोधनिबंध पुरस्कार मिळाला आहे. यासह  ७ राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय जर्नल्समधील शोधनिबंधांच्या प्रकाशनासह त्यांच्या नावावर दोन पेटंटची देखील नोंद झाली आहे. डाॅ.कुलकर्णी यांना या संशोधनात प्रा.डाॅ. डिंगरे यांचे मार्गदर्शन लाभले. 

सध्या ते एमआयटी एडीटी विद्यापीठातील स्कुल ऑफ इंजिनिअरिंगमध्ये  वरीष्ठ सहाय्यक प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत. विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्याध्यक्ष प्रा.डाॅ. मंगेश कराड, प्रा.डाॅ.सुनिता कराड, अधिष्ठाता प्रा.डाॅ. विरेंद्र शेटे, विभागप्रमुख प्रा. सुदर्शन सानप यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments