मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज
आमचे मार्गदर्शक तसेच राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय श्री. अजितदादा पवार यांची आपल्या पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी निवड झाल्याबद्दल आजच्या कोजागिरी पौर्णिमेच्या शुभदिनाचे औचित्य साधून, बालगंधर्व रंगमंदिर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे शहर सांस्कृतिक विभागाच्या वतीने 'चांद फिर निकला' या संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले होते.
संगीत म्हटलं की त्याला सूर-ताल आणि भावनांची जोड असणे साहजिकच. अतिशय संगीतमय वातावरण निर्माण करून कलाकारांनी रसिक प्रेक्षकांसाठी सादर केलेली विवीध संगीतबद्ध गीतांनी उपस्थितांच्या मनाला भुरळ घातली. यावेळी या कार्यक्रमासाठी कलाकार मंडळींसह श्रोत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
#पालकमंत्री #निवड #सांस्कृतिक #संगीत #कार्यक्रम #राष्ट्रवादी #पुणे #pune #ncp



Post a Comment
0 Comments