मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज
मुंबई : कल्याण जिल्हा अध्यक्ष ते राष्ट्रीय अध्यक्ष असा थक्क करणारा प्रवास करणारे मनोज काळसेकर यांच्या नावाची घोषणा पक्षाच्या संस्थापक अध्यक्ष अमृता भंडारी यांनी केली. अमृता भंडारी यांनी राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा देत इथून पुढे पक्षाचे सर्व निर्णय मनोज काळसेकर घेतली अशी माहिती दिली.
मनोज काळसेकर हे मेहनती असुन त्यांच्या मेहनती चे फळ त्यांना मिळाले असून राष्ट्रीय समाजवादी पार्टी म्हणजेच नॅशनल सोशालिस्ट पार्टी हा एक लोकशाही पक्ष असून इतरांप्रमाणे आम्ही पक्ष कार्यकर्त्यांवर पदाधिकारी तसेच निष्ठावंतांवर घराणेशाही लादलेली नाही.
मनोज काळसेकर त्यांच्या मर्जीप्रमाणे राष्ट्रीय कार्यकारिणीचे गठन करू शकतात अशी माहिती देण्यात आली.
राजकीय व्यूहरचना तसेच रणनितीकार अभिजीत कौशिक आपटे यांनी मनोज काळसेकर यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


Post a Comment
0 Comments