मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज
राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तसेच आपल्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. अजितदादा पवार पुणे दौऱ्यावर असता आज दादांच्या अध्यक्षतेखाली सर्किट हाऊस येथे पक्षाच्या सर्व नगरसेवक तसेच नगरसेविका, महापालिका आयुक्त यांची विविध विकासकामांसंदर्भात एकत्रित आढावा बैठक संपन्न झाली.
या बैठकीपूर्वी पक्षातील सर्व नगरसेवक आणि नगरसेवकांना आपल्या प्रभागातील विविध विकासकामांचे निवेदन घेऊन येण्याचे आवाहन करण्यात आले होते. या बैठकीदरम्यान पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने आपल्या विभागातील विकासकामांचे निवेदन माननीय दादांना दिले. यावेळी पक्षातील सहकारी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments