मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज
पुणे, दिः १४ ऑक्टोबर: एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ मीडिया अँड कम्युनिकेशन, पुणे तर्फे बुधवार दि. १८ ते १९ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत पाचवी राष्ट्रीय माध्यम व पत्रकारिता परिषद कोथरुड येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे. प्रसारमाध्यमांच्या विकसित होणार्या लॅडस्केप, पत्रकारितेवर कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभाव आणि पत्रकार सामाजिक मतभेदकसे दूर करू शकतात आणि एकता वाढूवू शकतात का या विषयावर ही परिषद आयोजित करण्यात येणार आहे.
पुणे युनियन ऑफ वर्किंग जर्नालिस्ट, मुंबई प्रेस क्लब, आर. के.लक्ष्मण संग्रहालय आणि नवी दिल्ली फॉरेन करस्पॉन्डंटस क्लब ऑफ साउथ एशिया यांच्या सहयोगाने ही परिषद होणार आहे.
या परिषदेचा उद्घाटन समारंभ बुधवार दि. १८ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १०.वा. होणार आहे. तसेच परिषदेचा समारोप समारंभ गुरूवार दि.गुरूवार दि.१९ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी ४.३० वा. होणार आहे.
अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे असतील. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांच्या संकल्पनेतून आणि नेतृत्वाखाली ही परिषद होणार आहे.
या समारंभात पत्रकारितेतील संवाद, सर्वसमावेशकता आणि शांतता या संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी एमआयटी डब्ल्यूपीयू द्वारे या वर्षी मुक्त पत्रकार तोरा अग्रवाल, सफिना नबी, आणि लल्लनटॉपचे पत्रकार सोनल पटेरिया यांना जर्नलिझम फॉर पीस पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कार्थींना प्रत्येकी ५० हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
या तीन दिवसीय प्रसारमाध्यम व पत्रकार परिषदेत सहा सत्र होणार आहेत.
१: मीडिया आणि लोकशाहीः अशांत समकालीन जगात मीडिया आणि लोकशाही यांच्यातील सहजीवन संबंधाबद्दल विविध दृष्टीकोनावर संबोधित करतील.
२: मार्जिन टू मेनस्टी्रमः बदलत्या मीडिया लॅडस्केपचा विकास करतील. जिथे विद्यमान मीडिया पद्धती मार्जिनवर ढकलल्या जात आहेत आणि उद्योगांना नवीन मीडिया पद्धमतीकडे लक्ष देण्यास भाग पाडले आहे.
३: युथ टू युथ ः माध्यम अभ्यासक प्रचलित करिअरच्या शक्यता आणि माध्यमांच्या विद्यार्थ्यासाठी संधी या विषयावर चर्चा करतील.
४: भारतातील माध्यम शिक्षणः शैक्षणिक आणि औद्योगिक दोन्ही क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती देशभरातील माध्यम प्रशिक्षण संस्था आणि ज्ञान निर्मिती केंद्रासमोरील नवीन आव्हांने विषयी अंतर्दृष्टी देतील.
५: सर्वसमावेशकता आणि प्रसारमाध्यमेः समकालीन भारतीय माध्यमांच्या सर्वसमावेशक वैशिष्ट्यांचे सखोल विश्लेषण असेल आणि माध्यमांमधील प्रतिनिधित्व आणि पक्षपाताच्या मुद्दयांवर सखोल अंतदृष्टी प्रदान करतील.
६: एआय आणि मीडियाः बातम्या निर्माण करणार्या माध्यमांमध्ये एआयच्या आक्रमणाशी संबंधित समस्यांवर गांभभर्याने लक्ष देईल आणि मीडिया उदयोग ज्या प्रकारे त्याच्या शक्यता आत्मसात करू शकेल आणि तोट्यांची जाणीव ठेवू शकेल त्या बद्दल अंतदृष्टी प्रदान करेल.
या व्यतिरिक्त यूथ टू यूथ असे सत्र होणार आहेत.
यामध्ये द वायरचे संस्थापक संपादक एम.के. वेणू, टाइम्स नेटवर्कचे व्यवस्थापकीय संपादक निकुंज गर्ग, चित्रपट दिग्दर्शक अभिजीत पानसे, मल्याळम चित्रपट अभिनेता सूरज कोलास्सेरी, ट्रान्स ऍक्टिव्हिस्ट कल्की सुब्रमण्यम, ब्लॉकचेन तज्ञ राज आदित्य कपूर, पत्रकार आशिष खेतान, सीएनएनचे संपादक प्रियम गांधी मोदी, प्रसिद्ध गायक गणेश चंदनशिवे, रिलायन्स अॅनिमेशनचे सीईओ आशिष कुलकर्णी, एनडीटीव्हीचे वरिष्ठ संपादक हिमांशू शेखर मिश्रा, मिरर नाऊचे सल्लागार संपादक सहारा जमान, इंडियन एक्सप्रेसच्या निवासी संपादक सुनंदा मेहता, पुढारी न्यूज टीव्हीचे नॅशनल न्यूज एडिटर प्रसन्न जोशी, अभिनेता ध्रुव सहगल, प्राध्यापिका उज्ज्वला बर्वे, प्रा. टी.टी श्रीकुमार, वरिष्ठ पत्रकार विनीता देशमुख आणि पीटीआयचे माजी संपादक राजेश महापात्रा उपस्थित राहणार आहेत.
देशातील पत्रकार व पत्रकारितेतील विद्यार्थी या राष्ट्रीय परिषदेत सहभागी होतील. ही राष्ट्रीय परिषद जास्तीत जासत यशस्वी होण्यासाठी माध्यम व पत्रकारितेतील जाणकार व्यक्तींनी आपला मौलिक सहभाग नोंदवून या राष्ट्रीय परिषदेच्या आयोजनाचा विधायक उद्देश सफल करावा असे आवाहन प्रमुख संयोजकांनी केले आहे.
https://www.mitwpu-ncmj.com या संकेतस्थळावर नोंदणी करावी.
अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हसिटीचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, एनसीएमजेचे निमंत्रक आणि स्कूल ऑफ मिडिया कम्युनिकेशनचे सहयोगी अधिष्ठाता धिरज सिंग, स्कूल ऑफ लिबरल ऑर्टसच्या सहयोगी अधिष्ठात डॉ. प्रिती जोशी, कार्यक्रम प्रमुख डॉ. विकास पाठे यांनी दिली.
जनसंपर्क विभाग,
एमआयटी डब्ल्यूपीयू, पुणे

Post a Comment
0 Comments