Type Here to Get Search Results !

राष्ट्रवादी पर्वती विधानसभा मतदारसंघाची जम्बो कार्यकारिणी जाहीर*

 मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे

अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज


आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पर्वती विधानसभा मतदारसंघाची *जम्बो कार्यकारिणी* जाहीर करण्यात आली.



शहराध्यक्ष श्री.दिपकभाऊ मानकर, कार्याध्यक्ष श्री.प्रदिपदादा देशमुख, सौ.प्रियाताई गदादे, युवकाध्यक्ष श्री.समीरदादा चांदेरे यांच्या हस्ते सर्व सेल अध्यक्ष, कार्याध्यक्ष, विधासभा प्रभाग अध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस, संघटक सचिव नेमुन त्यांना पदनियुक्ती देण्यात आली. 

 


समाजहितासाठी काम करा, आपला पक्ष हा प्रत्येक घटकापर्यंत पोचवा व त्याला न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा तसेच अजितदादा पवार यांच्या विचाराच्या व लोकहिताची कामे करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय दिला जाईल अशी ग्वाही शहराध्यक्ष दिपकभाऊ मानकर व प्रदीप दादा देशमुख यांनी दिली.



यावेळी विधानसभा अध्यक्ष श्री संतोषभाऊ नांगरे, प्रदेश प्रतिनिधी श्री.शिवाजीभाऊ गदादे, विधानसभा कार्याध्यक्ष श्री.विपुल म्हैसुरकर, कार्याध्यक्ष श्री.रामदास गाडे, सेवादलाच्या अध्यक्षा सौ.शशिकलाताई कुंभार, सामाजिक सेल अध्यक्ष श्री.जयदेव इसवे, ओ.बी.सी सेल कार्याध्यक्ष श्री.रूपेश आखाडे आदि मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments