Type Here to Get Search Results !

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सी बी एस ई) च्या पुणे इथल्या प्रादेशिक कार्यालयाने राबवली 'एक तारीख एक तास एक साथ' ही स्वच्छता मोहीम

 मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे

अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सी बी एस ई) च्या पुणे इथल्या प्रादेशिक कार्यालयाने राबवली 'एक तारीख एक तास एक साथ' ही स्वच्छता मोहीम


 

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सी बी एस ई) च्या पुणे इथल्या प्रादेशिक कार्यालयाने  'एक तारीख एक तास एक साथया उपक्रमाअंतर्गत आज स्वच्छता मोहीम राबवली. पुण्याच्या वडगाव शेरी इथल्या भिवाजी रावजी गलांडे उद्यानात हा उपक्रम पार पडला.




सी बी एस ई च्या विभागीय कार्यालयातील 50 अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांच्या नेतृत्वाखाली उत्साहपूर्ण वातावरणात निघालेल्या फेरीने या उपक्रमाची सुरुवात झाली.  कार्यालय ते भिवाजी रावजी गलांडे अशी ही फेरी होती. या फेरीत त्यांनी फलकबोधचिन्हे झळकवत आणि घोषणा देऊन लोकांमध्ये हा  कार्यक्रम आणि स्वच्छतेचे महत्त्व याबद्दल जनजागृती केली.



स्वच्छता हीच सेवा या भावनेने प्रेरीत होऊन भिवाजी रावजी गलांडे उद्यानातील विविध परिसर स्वच्छ करण्यासाठी सर्व अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या उत्साहाने एकत्र आले. यातून  खुल्या व्यायामशाळाचालण्याच्या मार्गिकाखेळाचे मैदान आणि बागेतील इतर मोकळ्या जागेची संपूर्ण स्वच्छता झाली. त्यामुळे प्रत्येकाला स्वच्छ आणि जास्तीत जास्त आकर्षित करून घेणारा परिसर मिळेल या हमीसह तशी वातावरण निर्मिती झाली. बागेतील चालण्याच्या मार्गिके वरील अगदी तणही परिश्रमपूर्वक काढण्यात आले.]

महत्त्वाचे म्हणजेसी बी एस ई चे अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी उद्यानात उपस्थित नागरिकांशी या निमित्ताने संवाद साधला. त्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले आणि त्यांच्या आजूबाजूच्या परिसरात स्वच्छ वातावरण राखण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली. नागरिकांनीही सकारात्मक प्रतिसाद देत सी बी एस ई चमूच्या प्रयत्नांचे कौतुक केले.


***

Post a Comment

0 Comments