मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज
रिपब्लिकन पार्टी च्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या नावाची प्रवेशद्वार कमानी याची मागणी.
सांगली येथील वाटेगावातील. साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या निवासस्थानी रिपब्लिकन पार्टीच्या वतीने नुकतीच भेट देण्यात आली यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्राचे वरिष्ठ उपाध्यक्ष विशाल शेवाळे, मातंग समाजातील ज्येष्ठ नेते अंकल सोनवणे यांच्या शुभ हस्ते लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(A) च्या वतीने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या नावाची प्रवेशद्वाराची कमानीची मागणी करण्यात आली.तसेच फकीरा यांची समाधी,मेगडंबरी व आजूबाजू परिसर सुशोभीकरण करण्याची मागणी.केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्याकडे करण्यात आली.
सामाजिक कार्यकर्ते व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्राचे वरिष्ठ उपाध्यक्ष विशाल शेवाळे साहेब यांनी याप्रसंगी सांगितले की सदर काम होईपर्यंत त्याचा पाठपुरावा प्रमाणिकपणे केला जाईल.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते इंद्रजीत सकट,शांतिनाथ चव्हाण,अतुल भालेराव,रमेश तेलवडे,सुरेश राजगे, इकबाल खान,अरबाज खान.आदी मान्यवर उपस्थित होते.



Post a Comment
0 Comments