Type Here to Get Search Results !

महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांना ४० बाय ८० फूट भव्य चित्रांद्वारे २०० विद्यार्थ्यांची मानवंदना*

 मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे

अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज


*महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांना ४० बाय ८० फूट भव्य चित्रांद्वारे २०० विद्यार्थ्यांची मानवंदना*

जाधवर ग्रुप ऑफ  इन्स्टिटयूट, न-हे तर्फे आयोजन ; संस्थेतील क्रीडा विभागाचा पुढाकार


पुणे : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्ताने न-हे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूट तर्फे ४० बाय ८० फूट आकारातील भव्य चित्रांद्वारे तब्बल २०० विद्यार्थ्यांनी या राष्ट्रपुरुषांना मानवंदना दिली. इन्स्टिटयूटमधील क्रीडा विभागाच्या पुढाकाराने राबविण्यात आलेल्या या अनोख्या उपक्रमात महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची रेखाचित्रे देखील ५० विद्यार्थ्यांनी काढली.

 

संस्थेच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमात २० बाय ४० फूट आकारातील दोन भव्य चित्रे काढण्यात आली होती. याकरिता मागील एका आठवडयापासून २०० विद्यार्थी तयारी करीत होते. संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड.शार्दुल जाधवर यांनी याकरिता विशेष मार्गदर्शन केले.

Post a Comment

0 Comments