मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज
पुणे, ८ सप्टेंबरः मानव कल्याण, द्रारिद्य्र निर्मूलन आणि शाश्वत विकासाच्या फायद्यासाठी पाणी, ऊर्जा आणि अन्न सुरक्षा हे तीन क्षेत्र अत्यंत आवश्यक आहेत. याच मुख्य विषयाला पकडून ओम एल आय चॅप्टर, पुणे (इंडिया)च्या लॅम्ब्डा अल्फा इंटरनॅशनल (यूएसए) शी संलग्न मानद सोसायटी फॉर लँड इकॉनॉमिक्स आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पाण्यचे संवर्धनातर्फे अन्न, सौरऊर्जा व पर्यावरण सुरक्षा या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. ही परिषद शनिवार, दि.९ सप्टेंबर रोजी कोथरूड येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्वामी विवेकानदं सभागृहात होणार आहे. अशी माहिती ओम एल आय चॅप्टर, पुणे चे अध्यक्ष, आर्कीटेक्ट आणि अर्बनप्लॅनर अनिलकुमार हाटकर आणि एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.
परिषदेचे उद्घाटन सकाळी १० वा. महाराष्ट्र वॉटर रिर्सोस रेग्यूलेटरी अथॉराइजचे सेवानिवृत्त अध्यक्ष डॉ. संजय चहांदे यांच्या हस्ते होणार आहे.
आयोजित परिषदेत उद्योग क्षेत्रांमध्ये पाणी, भूजल पातळीचे संकट, ऊर्जा वापर आणि वातावरणात वाढलेली ऊर्जा व कमी झालेला हिवाळा ते टिकवून ठेवण्यासाठी त्याच्या अंमलबजावणी, सर्वोत्तम तंत्रज्ञानाच्यापद्धतीचा वापर या दृष्टीने ओम एल आय चॅप्टर, पुणे तर्फे आयोजित परिषदेत अनेक परदेशी व स्थानिक मार्गदर्शक तत्त्वांवर चर्चा आणि परस्परसंवाद होणार आहे. यात प्रामुख्याने देशभरातील पाणी, अन्न आणि सौर क्षेत्रात गुंतलेले ज्येष्ठ सल्लागार, अर्थ तत्ज्ञ, आर्किटेक्ट, वापरकर्ते, उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवर एकत्रित येणार आहेत.
परिषदेत उद्घाटन पर भाषण ओम एल आय चॅप्टर, पुणेचे अध्यक्ष अनिलकुमार हाटकर करतील. तसेच महाराष्ट्र राज्यातील जलसंपत्ती नियमानातील आव्हाने या विषयावर महाराष्ट्र वॉटर रिर्सोस रेग्यूलेटरी अथॉराइजचे सेवानिवृत्त अध्यक्ष डॉ. संजय चहांदे हे विचार मांडतील.
प्रथम सत्रः कोलंबो येथील आंतरराष्ट्रीय जल व्यवस्थापन संस्थेचे डॉ. तुषार शाह हे पाणी, अन्न आणि ऊर्जा यांच्यातील परस्परावरील नियम आणि सरावाचे जागतिक पुनरावलोकन,
अॅडव्हॉन्स सेंटर फॉर वॉटर रिर्सोस डेव्हलपमेंट अॅण्ड मॅनेजमेंटचे संस्थापक ट्रस्टी आणि कार्यकारी संचालक डॉ. हिमांशू कुलकर्णी हे भारतातील भूजलाच्या शाश्वत व्यवस्थापन
कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी प्रॉस्टनेसचे डॉ. रवींद्र उटगीकर हे भारतातील बायोएनर्जीचे भविष्य या विषयावर विचार व्यक्त करतील.
द्वितीय सत्रात ः
माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड हे महाराष्ट्रातील साखर उद्योगाची राजकीय अर्थव्यवस्था
परिमो इन्स्फ्रास्ट्रक्चर डेव्हलमेंट कन्स्लटन्टस प्रा.लि.चे संचालक राजेंद्र होलानी हे नागरी क्षेत्रामध्ये जल व्यवस्थापन
आणि महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीच्या महासंचालक डॉ. कादंबरी बलकवडे या महाराष्ट्रात सौर ऊर्जेचा वापर आणि वृध्दीगत यश आणि आव्हाने या विषयावर विचार मांडतील.
तिसर्या सत्रातः माजी सचिव डॉ. सुरेश कुलकर्णी हे अन्न आणि जल सुरक्षा साध्यकरणे त्यांचा पिकांवर होणारा परिणाम या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करतील.
नवी दिल्ली येथील कौन्सिल फॉर एनर्जीचे इन्वॉरमेंट अॅण्ड वॉटरचे कार्यक्रम प्रमुख डॉ. नितीन बस्सी हे भारतातील प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याच्या पुनर्वापरात विकास या विषयावर विचार मांडतील.
त्याच प्रमाणे पुणे येथील जल दिंडी प्रतिष्ठानचे संस्थापक विश्वस्त नरेंद्र चुग यांच्या मार्गदर्शनात शहरांच्या सर्वोत्तम पद्धतीत हवामान लवचिकता या विषयावर चर्चा सत्र होईल.
आयोजित पत्रकार परिषदेत प्रा.राजीव मिश्रा, प्रकाश पाटील, चंद्रहास देशपांडे,अमोल हटकर, आनंद परांजपे, लक्ष्मण थिटे, आरिया चैनी व पूर्वा जोगळेकर उपस्थित होत्या.
या संबंधी सविस्तर माहितीसाठी www.aumlai.org या संकेत स्थळाला भेट दयावी.

Post a Comment
0 Comments