मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज
पुणे. ६ सप्टेंबर २०२३ नवी पेठ. भारतीय जनता पार्टी पुणे शहर प्रभाग क्रमांक २९ आणि द हिंदू फाउंडेशनच्या वतीने ३१ऑगस्ट २०२३ ला माजी आमदार जगदीश मुळीक भारतीय जनता पार्टी प्रदेश चिटणीस एडवोकेट वर्षाताई डहाळे यांच्या हस्ते प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट प्रशिक्षण कोर्स वर्गाचे उद्घाटन झाले.
२५ ते ३० हजार रुपये फी असलेला प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट प्रशिक्षण कोर्स, फक्त नोंदणी फी २५१/- रुपयांमध्ये घेण्यात आला.
या प्रशिक्षण वर्गाचा उद्घाटन समारंभ नवी पेठ येथील ज्ञानल मंगल कार्यालय येथे संपन्न झाला. या प्रशिक्षण वर्गाचे उदघाटक माननीय जगदीश मुळीक म्हणाले की, " स्त्री हि आदिशक्ती आहे. कधी कधी असे वाटते कि महिलांचा कॉन्फिडन्स कमी पडतो का ? पुढे कसे होणार, स्वतःच्या पायावर कशी उभी राहणार ? पण या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या महिला आहेत, या देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी झाल्या, प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती झाल्या. या सुद्धा महिलाच होत्या. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन आहेत. त्या पण खूप आत्मविश्वासाने देशाचे काम पाहत आहेत. सर्व महिलांनी आत्मविश्वासाने पुढे गेलं पाहिजे. राजमाता जिजाऊ यांच्या आत्मविश्वासामुळे छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य निर्माण करू शकले.
सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी शिक्षणाचा पाया रचला.
त्यामुळे धनंजय जाधव यांनी आयोजित केलेल्या मेकअप प्रशिक्षण वर्गामध्ये आपण आत्मा विश्वासाने प्रशिक्षण पूर्ण केले पाहिजे. तीन दिवसाच्या कोर्समुळे आपल्याला पुढे स्पर्धेत उतरता येईल. आणि आपला आत्मविश्वास वाढेल. त्यामुळे तुम्हाला रोजगार मिळेल तुम्हाला घरातूनही काम करता येईल. आणि आपल्या पायावर उभे राहता येईल. यातून आपण आपल्या संसाराला हातभार लावू शकतो. धनंजय जाधव हे वर्षभरामध्ये अनेक उपक्रम राबवतात त्यामुळे महिलांना रोजगाराच्या संधी निर्माण होतात.
यावेळी भारतीय जनता पार्टी प्रदेश चिटणीस एडवोकेट वर्षाताई डहाळे यांनीही मार्गदर्शन केले.
१ सप्टेंबर २०२३ ते ३ सप्टेंबर २०२३ रोज दोन तासाची एक बॅच अशा आठ बॅच मधून तीन दिवसांमध्ये २५६ महिलांनी मेकअप प्रशिक्षण पूर्ण केले. बेसिक अँड ऍडव्हान्स मेकअप, साउथ इंडियन मेकअप, वेस्टर्न मेकअप, ब्राईड मेकअप, सर्व प्रकारचे मेकअप, स्किन नॉलेज, प्रॉडक्ट नॉलेज, मार्केटिंग नॉलेज, विविध हेअर स्टाईल, सहावार, नऊवार साडी ड्रेपिंग, सर्व प्रकारचे लूक सर्व प्रकारचे मेकअप डेमो सह शिकवण्यात आले.
श्वेता देशमुख, सुहास साठे, रेणुका वायसे, भाग्यश्री खराडे या अनुभवी आणि प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट यांनी सर्व प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षित केले.
प्रशिक्षण वर्गात २५६ महिला युवतींना प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट प्रशिक्षण दिल्यानंतर पाच सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी अकरा वाजता एस एम जोशी फाउंडेशन चा हॉल, पत्रकार भवन शेजारी पुणे ३० येथे या प्रशिक्षित मेकअप आर्टिस्ट मेकअप स्पर्धा सकाळी ११ ते १२.३० या वेळेत स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये १५८ मेकअप आर्टिस्ट यांनी भाग घेतला.
या प्रशिक्षित मेकअप आर्टिस्ट यांची या ठिकाणी मेकअप स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये प्रशिक्षित आर्टिस्ट ने स्वतः दुसऱ्या एका महिलेवर ( मॉडेल वर ) मेकअप करून दाखवला.
महाराष्ट्रात प्रथमच मेकअप आर्टिस्ट ने मेकअप स्पर्धेमध्ये एकाच ठिकाणी एकाच वेळी १५८ महिलांनी भाग घेऊन स्वतः दुसऱ्यांवर केलेला मेकअप, पेहराव, हेअर स्टाईल, साडी ड्रीपिंग, घागरा ड्रेपिंग आपल्या मॉडेलला बरोबर घेऊन रॅम्प वॉक करीत सादर केला आणि आपला आत्मविश्वास वाढल्याचेही दाखवले. कित्येक महिला युवती ह्या प्रथमच मेकअप आर्टिस्ट प्रशिक्षण घेऊन मेकअप करून रॅम्प वॉक करीत होत्या. तर काहींनी जुरिंच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी प्रथमच माईक हातात घेऊन आत्मविश्वास पूर्वक उत्तरे देत होत्या.
या कार्यक्रमांस भाजपा प्रदेश चिटणीस वर्षाताई डहाळे, शहर चिटणीस प्रशांत हरसुले, भाजपा रिक्षा आघाडी पुणे शहर अध्यक्ष अंकुश नवले, शहर उत्तर भारतीय भाजपा आघाडी अध्यक्ष लालजी मिश्रा, कसबा मतदारसंघ सरचिटणीस राजेंद्र काकडे, छगन बुलाखे, युवा मोर्चा अध्यक्ष अमित कंक. पुणे शहर झोपडपट्टी आघाडी सरचिटणीस बाबू खैर, प्रभाग २९ भाजपा महिला आघाडी अध्यक्षा सुनीता जंगम, शहर भाजपा महिला आघाडी उपाध्यक्षा आशा शिंदे, कसबा भाजपा महिला आघाडी उपाध्यक्ष सुलभा पावसे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ गणेशोत्सवानंतर मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. या सर्धेत भाग घेतलेल्या पैकी एक ते वीस खास बक्षीसे देण्यात येणार असून यामध्ये सन्मान चिन्ह, भेटवस्तू, प्रमाणपत्र आणि काही संस्थांची डिस्काउंट कूपन्स देण्यात येणार आहे. तर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रत्येक महिला युवतीला प्रमाणपत्र आणि भेट वस्तू देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे संयोजन माजी नगरसेवक धनंजय जाधव आणि जयश्री जाधव यांनी केले.
सूत्रसंचालन योगेश सुपेकर विजय वाघचौरे यांनी तर आभार प्रदर्शन रवींद्र कांबळे यांनी केले.


Post a Comment
0 Comments