Type Here to Get Search Results !

पक्क्या अनुज्ञप्तीसाठी मासिक दौऱ्याचे आयोजन*

 मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे

अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज





पुणे, दि. २६: ऑक्टोबर २०२३ मध्ये पक्की अनुज्ञप्ती  मिळण्याच्यादृष्टीने पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे  खेड,  मंचर,  जुन्नर,  वडगाव मावळ आणि लोणावळा येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिली आहे.


पक्क्या अनुज्ञप्तीच्या चाचणीसाठी ३ आणि ४ ऑक्टोबर रोजी खेड, ९ आणि १० ऑक्टोबर रोजी मंचर, १६ आणि १७ ऑक्टोबर रोजी जुन्नर, २५ आणि २६ ऑक्टोबर रोजी वडगाव मावळ आणि ३० ऑक्टोबर रोजी लोणावळा येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पक्क्या अनुज्ञप्तीसाठी ३० सप्टेंबर रोजी सायं.  ५ वाजता कोटा उपलब्ध होणार आहे, असेही कळविण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments