मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज
120 दिवसात 31 देशांची भ्रमंती = सोनवणे कुटुंबाला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिल्या शुभेच्छा
पिंपरी चिंचवड शहरातील विवेक सोनवणे व त्यांचं कुटुंब १२० दिवसांत ३१ देशांची भ्रमंती करणार आहे. त्यांना या धाडसी प्रवासासाठी मनापासून शुभेच्छा देतो.
चिंचवडमधील क्रांतिवीर चाफेकर पुतळ्याला अभिवादन करून या कुटुंबानं आपला जग भ्रमंतीचा प्रवास सुरु केला आहे. याच दरम्यान मुंबईत त्यांनी माझी सदिच्छा भेट घेतली. या प्रवासादरम्यान सोनवणे कुटूंब 'वसुधैव कुटुम्बकम्' व 'ज्येष्ठ नागरिकांची काळजी घ्या' हा संदेश जगभरातील नागरिकांना देणार आहेत, ही अभिमानास्पद बाब आहे. त्यांचा प्रवास सुरक्षित आणि आनंदमय होवो हीच सदिच्छा.


Post a Comment
0 Comments