Type Here to Get Search Results !

श्रीराम आणि तथागत गौतम बुद्ध यांची भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते गगन मलिक यांची डीसीएम सोसायटीला सदिच्छा भेट

 

मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे

अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज



 श्रीराम आणि तथागत गौतम बुद्ध यांची भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते गगन मलिक यांची डीसीएम सोसायटीला सदिच्छा भेट .

भगवान श्रीराम आणि तथागत गौतम बुद्ध यांची भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते गगन मलिक यांची डीसीएम सोसायटीला सदिच्छा भेट देण्यात आली यावेळी डीसीएम सोसायटी ऑफ इंडियाचे माजी जनरल सेक्रेटरी दिवंगत एमडी शेवाळे सर यांच्या पुतळ्यास अभिनेते गगन मलिक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी डीसीएम सोसायटीचे अध्यक्ष डी टी रजपूत सर व डीसीएम सोसायटी ऑफ इंडियाचे जनरल सेक्रेटरी विशाल शेवाळे यांच्या हस्ते अभिनेता गगन मलिक यांना शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.



 यावेळी संस्थेचे खजिनदार सिद्धार्थ शेवाळे संस्थेचे प्रतिनिधी काजलताई शेवाळे, मुख्याध्यापिका शिल्पाताई भोसले, मुख्याध्यापिका सुनीताभोसरेकर, डॉ बाबासाहेब आंबेडकर कॉलेजचे प्राचार्य डॉ जगन्नाथ मस्के तसेच संस्थेचे पदाधिकारी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदि यावेळी उपस्थित होते.

 यावेळी अभिनेता गगन मलिक यांनी संस्थेचे सर्व माहिती जाणून घेतली व संस्थेला शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या

Post a Comment

0 Comments