Type Here to Get Search Results !

प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत पुणे जिल्ह्याच्या इंदापूर आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण व संगमेश्वर तालुक्यातील ऐतिहासिक स्थळं, देवस्थानं तसंच पर्यटन क्षेत्रांच्या विकासासंदर्भात आज बैठक पार पडली.

 मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे

अधिकृत पोर्टल भारत शक्ती न्युज



प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत पुणे जिल्ह्याच्या इंदापूर आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण व संगमेश्वर तालुक्यातील ऐतिहासिक स्थळं, देवस्थानं तसंच पर्यटन क्षेत्रांच्या विकासासंदर्भात आज बैठक पार पडली.


चिपळूण तालुक्यातील पेढे येथील सवतसडा धबधबा, चिपळूण-गुहागर बायपास रोडवरील पुरातन बौद्ध लेणी (दगोबाची लेणी) सुशोभीकरण करणं, इंदापूर येथील मालोजीराजे भोसले यांची गढी, हजरत चाँदशाहवली बाबांचा दरगाह, रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक, श्री मार्लेश्वर देवस्थान, श्री टिकलेश्वर मंदिर आदी क्षेत्रांना ऐतिहासिक, आध्यात्मिक, पुरातत्त्वीय वारसा आहे. या क्षेत्रांचा विकास करताना पुरातत्त्वीय महत्वं, ऐतिहासिक सौंदर्य जपण्यात यावं. नवीन बांधकाम करताना ते शेकडो वर्षांपूर्वीच्या मूळ वास्तूशी मिळतं-जुळतं असावं, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.


इंदापूर, चिपळूण, संगमेश्वर तालुक्यातील पर्यटन क्षेत्रांचा परिपूर्ण आराखडा सबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी तयार करून सादर करण्याचे निर्देश दिले. या विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, आवश्यक निधी तातडीनं उपलब्ध करून देण्यात येईल.

Post a Comment

0 Comments