Type Here to Get Search Results !

बॉम्बे सॅपर्स ते विश्रांतवाडी दरम्यान असलेला बीआरटी मार्ग काढण्याबाबत आज आमदार श्री बापू साहेब पठारे यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा. श्री. महेश आव्हाड यांची भेट घेत निवेदन दिले.

मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे 

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार 

पुणे..प्रतिनिधी...

बॉम्बे सॅपर्स ते विश्रांतवाडी दरम्यान असलेला बीआरटी मार्ग काढण्याबाबत आज आमदार श्री बापू साहेब पठारे यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा. श्री. महेश आव्हाड यांची भेट घेत निवेदन दिले. 

तसेच, संबंधित विषयावर सखोल चर्चा केली. 

या मार्गावर बीआरटीमुळे वाहतूक कोंडी वाढत असून नागरिकांना दररोज मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर सदर बीआरटी मार्ग तातडीने हटवून वाहतूक अधिक सुलभ व सुरळीत करण्याची मागणी केली. 

नागरिकांच्या सोयीसाठी व वाहतूक व्यवस्थेच्या सुधारासाठी आवश्यक ती कार्यवाही लवकरात लवकर करण्यात यावी, या मागणीवर आव्हाड साहेब यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

#mlabapusahebpathare #TrafficIssue #BRT #PMPML #Vishrantwadi

Post a Comment

0 Comments