मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार
पुणे...
२०२६-२०२७ हे महात्मा जोतिबा फुले यांचे जन्मद्विशताब्दी वर्ष आहे. यानिमित्ताने विविध उपक्रम आणि सत्यशोधक विचारांचा जागर करण्यासाठी विशेष मोहीम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून राज्यभर राबविली जाणार आहे. यासाठी महात्मा फुले उत्सव समिती स्थापन करण्यात आली असून या समितीची नियोजन बैठक आज काँग्रेस भवन,पुणे येथे संपन्न झाली.
या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब यांच्या सह पुणे शहराध्यक्ष अरविंदजी शिंदे,समितीचे अध्यक्ष श्री. भानुदास माळी, वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. मोहन जोशी, माजी मंत्री श्री. रमेश बागवे, श्री. किशोर कान्हेरे, श्री. भाई नगराळे,माजी आमदार दीप्तीताई चवधरी, वरिष्ठ प्रवक्ते श्री. गोपाळ तिवारी, पुणे मनपा गटनेते श्री. चंदूशेठ कदम, नगरसेवक प्रशांत जगताप, साहिल केदारी, सुनील शिंदे, श्री.सुनील मलके, प्रदेश सरचिटणीस सीमा गुट्टे, आमिर शेख, यशराज पारखी,ओ बी सी सेलचे अध्यक्ष प्रदीप परदेशी, युवक काँग्रेसचे अध्यक्ष सौरभ अमराळे, महिला शहराध्यक्षा स्वाती शिंदे,मा नगरसेवक कैलास गायकवाड, अजित दरेकर,लताताई राजगुरू,शहर उपाध्यक्षा प्राचीताई दुधाने, सरचिटणीस राज अंबिके, प्रियांका मधाळे, सिमाताई सावंत आदी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments