Type Here to Get Search Results !

ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत पुणे जिल्हा परिषद नवनियुक्त सदस्यांची बैठक* *जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी समन्वयाने काम करण्याचा निर्धार*

 


मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे 

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार 


पुणे:  पुणे जिल्हा परिषदेतील भाजपा, शिवसेना (एकनाथजी शिंदे), शिवसेना (उबाठा गट) यांच्या नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्यांची संयुक्त बैठक आज राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत  झाली. पुणे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हेच आपले सर्वांचे ध्येय असल्याने जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी समन्वयाने काम करण्याबाबत चर्चा झाली. 



या बैठकीला आ. राहुल कुल, आ. शरद सोनावणे, आ. बाबाजी काळे, भाजप प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, जिल्हाध्यक्ष शेखर वढणे, प्रदीप कंद, माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे, माजी आ. संजय जगताप, संग्राम थोपटे यांच्यासह जिल्हा परिषदेचे सर्व नवनियुक्त सदस्य उपस्थित होते.



फेब्रुवारी २०२६ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपचे १०, शिवसेना (शिंदे गट) ४, शिवसेना (उबाठा गट) ६, राष्ट्रवादी कॉंग्रेस (शप) १ सदस्य निवडून आले. ह्या सर्व सदस्यांची बैठक आज संपन्न झाली. यावेळी जिल्ह्यातील विविध समस्यांबाबत चर्चा झाली. तसेच, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी समन्वयाने काम करण्याचा निर्धार यावेळी सर्वांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments