Type Here to Get Search Results !

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची चंद्रकांतदादा पाटील यांनी घेतली भेट; तब्येतीची केली विचारपूस* "आण्णा काळजी घ्या, लवकर बरे होऊन पुन्हा जोमाने कामाला लागा!" अशा शब्दात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना शुभेच्छा दिल्या.

 


मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे 

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार 


पुणे..प्रतिनिधी..

*केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची चंद्रकांतदादा पाटील यांनी घेतली भेट; तब्येतीची केली विचारपूस*


"आण्णा काळजी घ्या, लवकर बरे होऊन पुन्हा जोमाने कामाला लागा!" अशा शब्दात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना शुभेच्छा दिल्या. 


केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना २९ वर्षांपूर्वी कुस्ती खेळताना पायाला दुखापत झाली होती. त्यावर नुकतीच एक शस्त्रक्रिया करण्यात आली. या पार्श्वभूमीवर चंद्रकांतदादा पाटील यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी उपस्थित डॉक्टरांशीही चर्चा करून मोहोळ यांच्या प्रकृतीबाबत माहिती जाणून घेतली. 


"आण्णा, स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्या आणि लवकरात लवकर बरे होऊन पुन्हा त्याच उत्साहाने जनसेवेच्या कामात सक्रिय व्हा," अशी सदिच्छा पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments