Type Here to Get Search Results !

समाजाच्या हक्कांसाठी, सन्मानासाठी आणि न्यायासाठी आज राजधानीत पुन्हा एकदा बुलंद आवाज घुमला… दलित महासंघाच्या वतीने जंतर-मंतर येथे एकदिवसीय धरणे आंदोलन पार पडले. या आंदोलनात पुणे जिल्हा मातंग समाजाचे पदाधिकारी रवी अप्पा पाटोळे, दिपकजी कसबे, लेखक संपत जाधव यांच्या



मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे 

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार 


नवी दिल्ली...

समाजाच्या हक्कांसाठी, सन्मानासाठी आणि न्यायासाठी आज राजधानीत पुन्हा एकदा बुलंद आवाज घुमला…

दलित महासंघाच्या वतीने जंतर-मंतर येथे एकदिवसीय धरणे आंदोलन पार पडले. या आंदोलनात पुणे जिल्हा मातंग समाजाचे पदाधिकारी रवी अप्पा पाटोळे, दिपकजी कसबे, लेखक संपत जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.



उदगीर, नांदेड, अहिल्यानगर, राहुरी, कोल्हापूर आदी भागांतून मातंग समाजाचे बांधव उपस्थित राहिले. तसेच हरियाणातील वाल्मिकी समाजाचे प्रदेशाध्यक्ष मा. पुरुषोत्तम वाल्मिकी यांची विशेष उपस्थिती या आंदोलनाला लाभली.

या आंदोलनाला मातंग एकता आंदोलन या राज्यव्यापी संघटनेने यांनीही ठाम पाठिंबा दर्शविला. तसेच माजी गृहराज्यमंत्री आदरणीय श्री रमेशदादा बागवे यांनीही यावेळी या आंदोलनाला समर्थन दिले.



आंदोलनातील प्रमुख मागण्या :

* लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना “भारतरत्न” पुरस्कार प्रदान करावा

* अनुसूचित जातींमध्ये अ ब क ड वर्गीकरण त्वरित लागू करावे

* ॲट्रॉसिटी कायदा अधिक कडक करावा

* बार्टी तसेच सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रलंबित शिष्यवृत्ती तात्काळ द्यावी

२०२४ पासून अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती न मिळाल्याने त्यांना परदेशातून मायदेशी परतावे लागले ,ही अत्यंत गंभीर बाब असून, यावर तातडीने निर्णय घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

हा लढा केवळ मागण्यांसाठी नाही, तर समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी आहे.

एकजूट, संघर्ष आणि आत्मसन्मान यांची ही ठाम भूमिका बदलाची नांदी ठरावी!

Post a Comment

0 Comments