मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार
पुणे : पुणे महानगरपालिकेतर्फे आयोजित पुणे महापौर चषक राज्यस्तरीय अश्वारोहण स्पर्धेत पहिल्या दिवशी टेंट पेगिंग प्रकारात नंदुरबारच्या एम.एन.हॉर्स रायडींग अकॅडमीच्या अभिषेक नवले, नवी मुंबईच्या अश्वरूढ क्रीडा असोसिएशनच्या अर्जुन बिश्त आणि अहिल्यानगराच्या राज अश्व हॉर्स रायडींग अकॅडमीच्या विठ्ठल जिगे यांनी आगेकूच केली. स.प. महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर ही स्पर्धा सुरु आहे.
स्पर्धेत स्टेट इक्वेस्ट्रीयन असोसिएशनचा सहभाग आहे. स्पर्धेचे उद्घाटन कर्नल (निवृत्त) सरप्रतापसिंह, राज्याचे माजी क्रीडा उपसंचालक जनक टेकाळे यांच्या उपस्थित झाले. पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, आयुक्त नवल किशोर राम, नगरसेवक धीरज घाटे, राघवेंद्र उर्फ बापू मानकर, स्वरदा बापट, कुणाल टिळक, स्वप्नाली पंडित यांसह असोसिएशनचे अध्यक्ष गुणेश पुरंदरे, सचिव नरेंद्र पाटील, खजिनदार विनायक हळबे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा स्पर्धेच्या नियोजनात सहभाग आहे.
रिंग टेंट पेगिंग या नव्या स्पर्धा प्रकारात थामेन्द्र कुमार (अश्वरूढ क्रीडा असोसिएशन) आणि अर्जुन बिश्त (अश्वरूढ क्रीडा असोसिएशन) यांना विभागून सुवर्णपदक आणि गुरुप्रीत सिंग (अश्वरूढ क्रीडा असोसिएशन) यांना रौप्य पदक मिळाले.
जिमखाना प्रकारातील बॉल अँड बकेट मध्ये चिल्ड्रेन १ (वय १२ ते १४) गटात स्वराज राजे (सुवर्ण), श्रावणी गायकवाड (रौप्य), ऋतुराज काळे (ब्राँझ) यांनी पारितोषिक मिळविले. चिल्ड्रेन २ (वय १० ते १२) गटात स्वयंम संचेती (सुवर्ण), अलंक्रीता राजपुरोहित (रौप्य) यांनी पदके मिळवली. तर, ज्युनियर (वय १४ ते १६) गटात पार्थ सोलत याने सुवर्णपदकाची कमाई केली.
ऑलिम्पिकमधील खेळाचा वेगळा प्रकार असलेल्या अश्वारोहण स्पर्धेचा हा थरार दि. १५ मार्च पर्यंत स.प. महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर दररोज सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ७ यावेळेत पुणेकरांना अनुभवता येणार आहे. स्पर्धा पाहण्यासाठी प्रवेश विनामूल्य असून पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
* फोटो ओळ : पुणे महानगरपालिकेतर्फे आयोजित पुणे महापौर चषक राज्यस्तरीय अश्वारोहण स्पर्धेत पहिल्या दिवशी टेंट पेगिंग प्रकारात स्पर्धा झाली. स.प. महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर ही स्पर्धा सुरु आहे. यावेळी कौशल्य दाखविताना स्पर्धक.
*


Post a Comment
0 Comments