मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार
पुणे : ऑलिम्पिकमधील खेळाचा वेगळा प्रकार असलेल्या अश्वारोहण स्पर्धेचा थरार आजपासून (दि.१२ मार्च ) पुणेकरांना अनुभवता येणार आहे. पुणे महापौर चषक राज्यस्तरीय अश्वारोहण स्पर्धेत स्टेट इक्वेस्ट्रीयन असोसिएशनचा सहभाग असून दि. १२ ते १५ मार्च दरम्यान स.प. महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर ही स्पर्धा होणार आहे. यामध्ये राज्यातील ८ जिल्ह्यातील १७५ हून अधिक स्पर्धक सहभागी होतील, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष गुणेश पुरंदरे यांनी दिली.
पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, आयुक्त नवल किशोर राम, नगरसेवक धीरज घाटे, राघवेंद्र उर्फ बापू मानकर, स्वरदा बापट, कुणाल टिळक, स्वप्नाली पंडित यांसह असोसिएशनचे अध्यक्ष गुणेश पुरंदरे, सचिव नरेंद्र पाटील, खजिनदार विनायक हळबे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा स्पर्धेच्या नियोजनात सहभाग आहे.
ड्रसाज, शो जम्पिंग, टेंट पेगिंग यांसह जिमखाना प्रकारात ही स्पर्धा होईल. वयवर्षे १० ते १२, १२ ते १४, १४ ते १६, १६ ते १८ आणि १८ च्या पुढे खुला गट अशा पाच वयोगटात स्पर्धा होणार आहे. पुण्यासह मुंबई, अहिल्यानगर, नाशिक, नंदुरबार, सोलापूर अशा विविध ठिकाणांहून स्पर्धक सहभागी होत आहे.
विजेत्यांना एकूण २ लाख ४० हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येतील. रविवार, दि. १५ मार्च रोजी सायंकाळी स्पर्धेचा पारितोषिक वितरण कार्यक्रम होणार आहे. दि. १२ ते १५ मार्च दरम्यान दररोज सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ७ यावेळेत पुणेकरांना अश्वारोहणाचा हा थरार अनुभवता येणार आहे. तरी पुणेकरांनी मोठ्या संख्येने स्पर्धेला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
माध्यम समन्वयक - मो. ९०२८४२६३४५, ९०२८७८७०५८

Post a Comment
0 Comments