मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार
पुणे...प्रतिनिधी ...
धायरी परिसरातील लोकमत ऑफिस ते DP Road (सावित्री गार्डन) या नवीन डीपी रोडच्या कामाला लवकरच गती मिळणार आहे.
या प्रस्तावित रस्त्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. सदर मार्गामध्ये काही स्थानिक नागरिकांच्या जागांचा समावेश होत असल्याने संबंधित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः उपस्थित महिलांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी, सूचना आणि अपेक्षा जाणून घेण्यात आल्या.
विकासकामे करताना नागरिकांचा विश्वास आणि सहभाग महत्त्वाचा असल्याने सर्वांच्या सहकार्याने हा रस्ता नियोजित वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
यावेळी
आयुक्त श्री नवल किशोर राम साहेब, शहर अभियंता श्री पावसकर साहेब, नगरसेवक राजाभाऊ लायगुडे, हरिदास चरवड, सोपान काका चव्हाण तसेच नगरसेविका कोमल नवले, जयश्री भूमकर, स्नेहलता कोल्हे व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments