Type Here to Get Search Results !

अजितदादांच्या दुर्दैवी अपघाती निधनाच्या चौकशी ची व्याप्ती वाढविण्यासाठी श्री संदीप खर्डेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे चौकशीची केली मागणी



मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे 

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार 


पुणे ..प्रतिनिधी..

 अजितदादांच्या दुर्दैवी अपघाती निधनाच्या चौकशी ची व्याप्ती वाढविण्यासाठी श्री संदीप खर्डेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे चौकशीची केली मागणी 

राज्याचे कर्तृत्ववान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघातातील सत्य हे ब्लॅक बॉक्स च्या तपासणी नंतर बाहेर येईलच मात्र त्याचा बरोबर आपण सी आय डी मार्फत तपासाचे आदेश ही दिले आहेत जे राज्य सरकारच्या पारदर्शक कार्यपद्धतीचे व संवेदनशीलतेचे प्रतीक आहे.

मात्र सध्या अनेक लोकं नको नको त्या शंका उपस्थित करत आहेत... कोणी विमानाचा रंग निळा होता लाल कसा झाला, कोणी 5 जण होते की 6,कोणी काय तर कोणी काय.... कोणाला 7 ला फोन आला बारामतीतून.... केवळ प्रसिद्धी साठी आणि Like साठी जनतेत असंतोष पसरविणाऱ्या आणि सामान्य नागरिकांच्या मनात शंकेला जागा उपलब्ध करून देणाऱ्या अश्या सर्वांची CID चौकशी झालीच पाहिजे अशी आग्रही मागणी करत आहे. सामान्य नेटकर्ते आपण काही काळ बाजूला ठेऊ यात मात्र काही नेते मंडळी देखील सोशल मीडिया वर विविध संदर्भ पोस्ट करून दादांच्या निधनाबद्दल वक्तव्य करत आहेत.




ही मंडळी जबाबदार नेते असल्यामुळे त्यांच्याकडे खचितच काही महत्वाची माहिती असण्याची शक्यता आहे. तरी आपण सी आय डी मार्फत चौकशी करताना त्याची व्याप्ती वाढवून सोबतच सोशल मीडिया वर अश्या पोस्ट करणाऱ्यांची देखील चौकशी करावी व त्यांचे सूत्र, माहितीचे जनक यांची चौकशी करून त्यातून सत्य जनतेसमोर मांडावे. संबंधित व्यक्ती त्यांचे दावे सिद्ध करू न शकल्यास त्यांच्यावर देखील योग्य ती कारवाई करावी.

Post a Comment

0 Comments