मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार
.. पुणे दि.२५ - भारत निवडणूक आयोग ,२०८ वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ यांच्या वतीने १६ वा राष्ट्रीय मतदार दिवस विद्यानगर येथील पुणे इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी सुधाकर माघाडे , निवडणूक नायब तहसीलदार श्रीमती सीमा चिंचवडे, पुणे इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन डॉ. हुलगेश चलवादी ,उपाध्यक्ष ऍड. रेणुका चलवादी (शिर्के), माजी सैनिक माणिक कुतळ, रामराव पुंडे, भिवाजी भगत , प्राचार्य स्मिता लोंढे ,वडगाव शेरी मतदार संघाच्या आशा स्वामी आदी उपस्थित होते .
यावेळी पुणे इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व निबंध स्पर्धेत उत्साहात भाग घेतला तसेच मतदार दिनानिमित्त भाषणेही केली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी तसेच विविध स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र ,तुळशीचे रोप व गुलाब पुष्प भेट देऊन सन्मान करण्यात आला. यानंतर मतदार दिनाचे औचित्य साधून प्रतिज्ञा घेण्यात आली.
सुधाकर माघाडे व ऍड. रेणुका चलवादी यांनी आपल्या भाषणात सर्व कर्मचारी वर्गाचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा गायधने व हसीना चौधरी यांनी तर आभार रुषाली सुर्वे यांनी मानले.



Post a Comment
0 Comments