मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार
पुणे ..प्रतिनिधी ..
फुलेनगर-नागपूरचाळ प्रभाग क्रमांक २मध्ये भाजपची प्रचार रॅली व हळदी कुंकू कार्यक्रमास महिलांचा मोठ्या प्रमाणात उपस्थिती.......
पुणे महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्र.२फुलेनगर नागपूरचाळ मध्ये भाजपा आर पी आय आठवले गटाचे उमेदवार ऍड.रेणुका चलवादी ,सुभाष वाघमोडे,राहुल जाधव व भाजपा पुरस्कृत अदिती बाबर यांनी आज एकता नगर , सैनिक नगर , श्रमिकनगर , कामगार नगर ,पंचशील नगर , हिरामन मोझेनगर , चंद्रमा नगर ,मेंटल कॉटर, मोहनवाडी, जाधवनगर , राजीव गांधी नगर, प्रतिकनगर या परिसरात प्रचार रॅली काढण्यात आली .
ठिकठिकाणी सर्व उमेदवारांचे औक्षण करण्यात आले. त्या नंतर महिलांसाठी हळदी कुंकू या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सदर कार्यक्रमास महिलांनी आपल्या समस्या मांडल्या व त्या आजपर्यंत कोणत्याही राजकीय पुढारी अथवा नगरसेवकानी सोडवल्या नसल्याचे नागरिकांनी सांगितले . आपल्या सर्व समस्या आपली मुलगी , बहीण या नात्याने सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे रेणूकाताई चलवादी यांनी सांगितले . रॅलीमध्ये व हळदी कुंकू कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या .


Post a Comment
0 Comments