Type Here to Get Search Results !

आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीसाठी, एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून श्री अमित सोनवणे पुणे शहर कार्यालयात उपस्थित राहिले. पाबळ–केंदूर जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पार्टीच्या विचारांवर, ध्येयधोरणांवर आणि नेतृत्वावर पूर्ण विश्वास ठेवून इच्छुक उमेदवार म्हणून श्री अमित सोनवणे यांनी अर्ज सादर केला.

 


मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे 

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार 


पुणे...

आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीसाठी, एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून श्री अमित सोनवणे पुणे शहर कार्यालयात उपस्थित राहिले. 

पाबळ–केंदूर जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पार्टीच्या विचारांवर, ध्येयधोरणांवर आणि नेतृत्वावर पूर्ण विश्वास ठेवून इच्छुक उमेदवार म्हणून श्री अमित सोनवणे यांनी  अर्ज सादर केला.

स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत समिती व पुणे जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर (पुणे उत्तर जिल्हा) पक्षाने राबवलेली ही प्रक्रिया संघटन मजबूत करण्यासाठी, तळागाळातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी आणि जनतेशी थेट नातं असलेलं नेतृत्व उभं करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. भारतीय जनता पार्टी ही केवळ पक्ष नसून ती माझी विचारधारा, माझी ओळख आणि माझं कुटुंब आहे, याची आज पुन्हा एकदा जाणीव झाली.

सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देणारा, मेहनत आणि एकनिष्ठतेची कदर करणारा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी नेहमीच उभी राहिली आहे. जनतेच्या अपेक्षांना साजेसं, सेवाभावाने काम करणारे आणि पक्षाशी अखंड निष्ठा ठेवणारे नेतृत्व घडवण्याचा हा पक्षाचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे, याचा आज प्रत्यक्ष अनुभव आला.

यावेळी महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस माननीय श्री. राजेश जी पांडे, दौंडचे आमदार मा. श्री राहुल कुल साहेब, पुणे जिल्हाध्यक्ष मा. श्री प्रदीप दादा कंद साहेब यांची उपस्थिती व मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे पक्षासाठी, जनतेसाठी आणि संघटनासाठी अधिक ताकदीने काम करण्याची प्रेरणा मिळाली.

देव, पक्षनेतृत्व आणि जनतेच्या आशीर्वादाने भारतीय जनता पार्टीच्या झेंड्याखाली अखंड निष्ठेने सेवा करण्याची संधी मिळो, हीच मनापासून प्रार्थना.


Post a Comment

0 Comments