मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार
पुणे प्रतिनिधी शंकर जोग,
पुणे-सेंट ॲण्ड्र्यूज हायस्कूल फॉर गर्ल्स, कॅम्प पुणे येथे शालेय वार्षिक स्नेहसंमेलन पारितोषिक वितरण समारंभ व विविध गुणदर्शन शैक्षणिक वर्ष 2025 -26 चा कार्यक्रम उत्साहात पार पडला यावेळी या कार्यक्रमास भरपूर पालकांनी प्रतिसाद देत कार्यक्रम यशस्वी केला,
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जॉन विल्सन एज्युकेशन सोसायटीचे सचिव- डॉ,लाल बहादूर कांबळे, अनिल गडकरी सर, नाशिक धर्मप्रांताचे धर्मगुरू रा.रेव्ह. प्रदीप कांबळे सुप्रिया पवार, मेघा माहीम कर, सुधीर साळुंके, मार्शल बनसोडे, उपस्थित होते,
शिवसेनेचे शिक्षक शिक्षकेतर अध्यक्ष, पुणे येथील श्री.अनिल गडकरी (सर) यांनी देखील विद्यार्थिनींना प्रेरणा दिली तसेच हुशार व अष्टपैलू विद्यार्थिनीला फिरता चषक देत आपल्या आईच्या स्मरणार्थ तर दरवर्षी देण्याचे जाहीर केले, हा फिरता चषक इयत्ता दहावीची विद्यार्थिनी ॲजलिना मावळी हिने पटकावला,
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना साठे यांनी शालेय वार्षिक अहवालाचे वाचन केले,
विद्यार्थिनींनी विविध व नृत्याविष्कारातून कलागुण सादर केले, सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका मारिया देठे यांनी केले व आभार सीमा कांबळे यांनी मानले,


Post a Comment
0 Comments