मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार
.पुणे दिनांक 19 - ज्याच्या घरात आई व बाप आहे तो जगातील सर्वात श्रीमंत माणूस असल्याचे मत प्रा. वसंत हंकारे यांनी व्यक्त केले.
अण्णाभाऊ साठे सभागृह येरवडा येथे कालकथीत मरिअप्पा चलवादी यांच्या स्मरणार्थ इयत्ता सातवी ते बारावीच्या विद्यार्थी व पालकांसाठी आयोजित ll कधीही न समजणारे आईबाप ll भरकटलेली तरुणाई व न समजलेले आईबाप समजून घेताना ......या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. हुलगेश चलवादी, ऍड. रेणुका चलवादी (शिर्के ), स्वप्निल शिर्के, प्राचार्य स्मिता लोंढे , व्यवस्थापिका सायली शिंदे आदि उपस्थित होते .मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले आयुष्यात आपला एकच देव आहे त्याचे नाव बाप असून, एकच देवी आहे तिचे नाव आई आहे , जोपर्यंत आई बापाचा श्वास आहे तोपर्यंत त्यांना जीव लावा कारण परमेश्वर त्यालाच प्रसन्न होतो तो आपल्या आई बापाला जपतो असे त्यांनी पुढे सांगितले .
विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नये दररोज व्यायाम करावा आपले शरीर निरोगी ठेवावे हा कानमंत्र त्यांनी यावेळी दिला. उपस्थित वडिलांमधून काही वडिलांना व त्यांच्या मुलांना व्यासपीठावर बोलावून घेतले व बाप कसा असतो हे सांगितल्यावर सर्व मुलांनी आपल्या वडिलांना कडकडून मिठी मारली त्यावेळेस सर्व सभागृह शांत झाले , तर अनेकांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले .तत्पूर्वी दीपप्रज्वलन करून सर्व राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हुलगेश चलवादी व ऍड. रेणुका चलवादी (शिर्के) यांनी प्रा. हुंकारे यांचे स्वागत करून महात्मा फुले पगडी , शाल ,संविधान व डायरी देऊन त्यांचा सन्मान केला.



Post a Comment
0 Comments