Type Here to Get Search Results !

रोल बॉल स्पर्धांचा थरार आजपासून सुरू होणार बाणेर येथील रोल बॉल कोर्टवर रंगणार सामने ... देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतील ‘फिट इंडिया’ संकल्पनेअंतर्गत पुण्यात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवात उद्या, गुरुवारपासून रोल बॉलच्या सामन्यांचा थरार रंगणार आहे. बाणेर येथील रोल बॉल कोर्टवर हे सामने होतील.

 


मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे 

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार 


पुणे..प्रतिनिधी...

या स्पर्धेत विविध गटामध्ये एकूण ५२ संघ सहभागी होणार आहेत. पुण्यातील सर्वोत्तम २९१ मुले आणि १६० मुली या स्पर्धेच्या माध्यमातून आपले रोल बॉल खेळाचे कौशल्य दाखवतील. एकूण ४० पदाधिकारी पंच या स्पर्धेच्या संयोजनाची जबाबदारी सांभाळणार आहेत.

११ वर्षाखालील गटात मुलांचे नऊ आणि मुलींचे सहा असे एकूण १५ संघ सहभागी होतील. १४ वर्षाखालील गटात मुलांचे १३ आणि मुलींचे आठ असे २१ संघ सहभागी होतील.




सतरा वर्षाखालील गटात मुलांचे चार आणि मुलींचे सहा असे एकूण दहा संघ लढतील. वरिष्ठ गटामध्ये मुलांच्या आणि मुलींच्या प्रत्येकी सहा टीम विजेतेपदासाठी आपला सर्वोत्तम खेळ करतील.

शालेय मुला-मुलींपासून राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी केलेल्या महाराष्ट्रातील गुणवंत खेळाडूंचा रोल बॉलचा खेळ पाहण्याची संधी या स्पर्धेच्या निमित्ताने मिळणार आहे.

Post a Comment

0 Comments