मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार
पुणे 10 नोव्हेंबर (प्रतिनिधी)
पुणे येथील श्री स्वामी ओम मल्हारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर गौरव पोपट घोडे यांचा अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासा तर्फे अनोखा सन्मान करण्यात येणार आहे. याबाबत नासाने बोर्डिंग पास जारी केला आहे, अशी माहिती एका पत्रकार परिषदेत सोमवारी (10 नोव्हेंबर) डॉक्टर घोडे यांनी पत्रकारांना दिली.
ते म्हणाले, नासाच्या आर्टीमिस टू या चंद्र मोहिमेअंतर्गत ओरियन स्पेस क्राफ्ट दहा दिवसांसाठी चंद्र मोहिमेवर पाठवले जाणार आहे. हे ओरियन स्पेस क्राफ्ट चंद्रावर दहा दिवसांसाठी असेल. त्यासोबत मायक्रोचीपवर एचिंग करून जगातील निवडक प्रतिभावान व्यक्तींची नावे आणि परिचय मेमरी कार्ड मध्ये समाविष्ट केला जाणार आहे. त्या निवडलेल्या प्रतिभावान व्यक्तींमध्ये भारताचे सुपुत्र डॉक्टर गौरव पोपट घोडे यांचे देखील नाव समाविष्ट करण्यात आले आहे.
याबाबत पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती देताना डॉक्टर गौरव घोडे म्हणाले, ही मोहीम पुढील वर्षी म्हणजे वर्ष 2026 मध्ये जाणार आहे. नासाच्या आर्टिमिस टू, [आर्टिमिस II] चंद्र मोहिमेअंतर्गत, ओरियन स्पेस क्राफ्ट दहा दिवसांसाठी चंद्र मोहिमेवर पाठवले जाईल.
मोहिमेमध्ये चार अंतराळवीर असतील. त्यामध्ये रीड वाईजमन व्हिक्टर ग्लोव्हर, क्रिस्टीना कोच (मिशन स्पेशालिस्ट),
(कॅनेडियन स्पेस एजन्सीचे
जेरेमी हॅन्सन यांचा समावेश आहे.
मायक्रोचिपवर ^^एचिंग^^ (एचिंग) करून जगातील निवडक प्रतिभावान व्यक्तींची नावे आणि परिचय मेमरी कार्डमध्ये समाविष्ट केला जाणार आहे.
महाराष्ट्रातील तुटलेल्या, फुटलेल्या मंदिरांची डागडुजी करणे, भग्नावस्थेतील मूर्तींचे वज्रलेपन करणे आणि इतर धार्मिक कार्य
अशा डॉक्टर घोडे यांच्या योगदानाचा
या निमित्ताने गौरव करण्यात आला आहे.
पुणे निवासी ३५ वर्षीय डॉ. गौरव पोपट घोडे हे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत.
त्यांनी अनेक महत्वपूर्ण सामाजिक कार्यात योगदान दिले आहे.
त्यामध्ये
1छत्रपती शिवाजी महाराजांच्या सूनबाई छत्रपती ताराराणी यांच्या समाधीला वज्रलेपन करून सुरक्षित करण्यात आले.
2. छत्रपती संभाजी महाराजांचे सुपुत्र थोरले शाहू महाराज यांच्या दुर्लक्षित असलेल्या जन्मखुणांना वज्रलेपन करून सुरक्षित करण्यात आले.
3. छत्रपती संभाजी महाराज यांच्या सुकन्या भवानीबाई राजे महाडिक यांच्या समाधीपुढे तुळशी वृंदावनाचे काम सुरू आहे.
4.कुलदैवत खंडोबाच्या मंदिरातील मूर्तींची दुरुस्ती आणि लेप करणे,
5.मंदिरांमधील गरजूंना अन्नदान करणे,
6.महाआरतीच्या शुभ आणि मंगळवारी, मल्हार सहस्रनाम कवली आणि भाविकांना मार्तंड विजय ग्रंथ च्या हजारो प्रती भेट देणे,
7. मंदिरांमध्ये सेवा करणे,
8. गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करणे आणि बरेच योगदान दिले आहे.
डॉक्टर गौरव घोडे हे श्री स्वामी ओम मल्हारी प्रतिष्ठान च्या माध्यमातून सामाजिक कार्य करत आहेत. प्रतिष्ठानने उल्लेखनीय केलेली कामे पुढीलप्रमाणे,

Post a Comment
0 Comments