मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार
पुणे प्रतिनिधी...
प्रभाग क्र. 21मध्ये 26 नोव्हेंबर 2025 रोजी मीनाताई ठाकरे वसाहत व गुलटेकडी चौक येथे सविधन दिन साजरा करण्यात आला यावेळी भाजपाच्या समृद्धीताई अरकल -शेरला व आर पी आय (आठवले) पुणे शहर कार्याध्यक्ष मा बस्वराज गायकवाड यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले.
यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांकडून संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक रित्या वाचन करण्यात आले या कार्यक्रमात भाजपचे नेते गणेश शेरला यांच्या हस्ते नागरिकांना संविधान प्रत देऊन संविधान दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमास आर पी आय पर्वती विधानसभा अध्यक्ष मा अविनाश गायकवाड,शाखा अध्यक्ष संजय गायकवाड, विधानसभा सरचिटणीस बाळासाहेब शेलार यश चव्हाण मुन्ना मुलानी, फिरोज शेख यांनी संविधाना बद्दल माहिती सांगितली .
तसेच प्रभागातील अनेक अंगणवाड्यामध्ये लहान मुलांना संविधान वाटप करण्यात आले सदर कार्यकर्मास नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते



Post a Comment
0 Comments