मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार
पुणे १२ : समस्त पुणेकर ज्याची आतुरतेने वाट पाहतात, त्या दि पूना मर्चटस् चेंबरच्या लाडू-चिवडा उपक्रमाचा शुभारंभ येत्या १४ ऑक्टोंबर रोजी होणार आहे. चेंबरच्या या सामाजिक उपक्रमाचे यंदा ३८ वे वर्ष आहे.
सदर लोकप्रिय उपक्रमाचे उदघाटन जिल्हाधिकारी मा. श्री. जितेंद्रजी दुड्डी व पोलीस आयुक्त अमितेशकुमारजी यांच्या शुभहस्ते मंगळवार दि. १४ ऑक्टोंबर २०२५ रोजी सायं. ५.०० वाजता जयजिनेंद्र प्रतिष्ठान, नाजुश्री सभागृह, (गंगाधाम जवळ) येथे होणार आहे
स्वच्छ वातावरणात तयार होणारा हा लाडू चिवडा अप्रतिम दर्जामुळे सर्वांच्याच पसंतीला उतरला असून शिखरावर पोहचला आहे. त्यामुळे समाजीतील सर्व स्तरावरुन त्याला मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. सदर लाडू चिवड्याच्या मागणीसाठी जनतेकडून दिवाळीच्या एक महिना अगोदर पासून विचारणा केली जाते. त्यामुळे यंदा २३ वितरण केंद्राद्वारे पिंपरी चिंचवडसह शहरातील सर्व भागातील नागरिकांना लाडू चिवडा उपलब्ध होईल याची दक्षता घेतली आहे.
एक किलो आणि अर्धा किलो अशा पॅकिंगमध्ये लाडू चिवडा उपलब्ध होईल. एक किलोचा दर १९०/- रुपये आणि अर्धा किलोचा दर १००/- रुपये ठेवण्यात आला आहे.
सदर उपक्रमाची दखल लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस् आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्ने घेतली आहे. तसेच चेंबरच्या अमृत महोत्सवी वर्षात सदर उपक्रमाची इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉडर्स व इंडियाज वर्ल्ड रेकॉडर्स मध्ये नोंद झाली आहे. नुकतीच लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांनी सदर उपक्रमाची दखल घेतली असून उपक्रमाच्या उदघाटन प्रसंगी दि पूना मर्चेंटस् चेंबरला प्रमाणपत्राद्वारे गौरविण्यात येणार आहे.
आधुनिक मशीन द्वारे चिवड्याचे पॅकिंग केले जाणार असून मालाच्या दर्जावर देखरेख करण्यासाठी फूड टेक्निशियन नियुक्त केले जाणार आहेत. काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी होणार आहे. त्यामुळे पदार्थाची गुणवत्ता, पोषणमूल्ये आणि स्वच्छता यां तिन्ही स्तरांवर उत्कृष्ट दर्जा राहणार आहे.
नेहमीप्रमाणे यावेळी विविध सामाजिक संस्था तसेच सिमेवरील जावानांसाठी लाडू चिवडा मदत स्वरुपात देण्यात येणार आहे, अशी माहिती दि पूना मर्चेंटस् चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी उपाध्यक्ष अजित बोरा, सचिव ईश्वर नहार, सहसचिव आशिष दुगड, माजी अध्यक्ष रायकुमार नहार, राजेश शहा आणि प्रविण चोरबेले, उत्तम बाठिया, दिनेश मेहता, अशोक अगरवाल, महिपालसिंह राजपुरोहित, प्रकाश नहार, संदिप शहा, आशिष नहार, दलाराम चौधरी, प्रणव गुगळे, संकेत खिवंसरा, किरण गुजर, कल्पेश गुजर इत्यादी कार्यकारिणी सदस्य व सभासद उपस्थित होते.
(राजेंद्र बाठिया)
अध्यक्ष
टिप - सदर प्रेसनोटबरोबर दिलेली विक्री केंद्रांची नांवे आपल्या वृत्तपत्रांमध्ये द्यावीत. जेणेकरुन नागरिकांना सदर लाडू चिवडा उपक्रमाचा लाभ घेता येईल.
लाडू चिवडा वितरण केंद्र
१. दि पूना मर्चेंटस् चेंबर, व्यापार भवन, गुलटेकडी, मार्केट यार्ड
२. श्री. सुर्यकांत पाठक, ग्राहक पेठ, एस. पी. कॉलेज समोर, टिळक रोड, पुणे
३. श्री. प्रविण चोरबेले, आझाद मित्र मंडळ, निमंत्रण हॉटेल शेजारी, बिबवेवाडी रोड, पुणे.
४. मे. जयश्री ग्रोसरी अॅन्ड ड्रायफ्रुटस् प्रा. लि., मृत्युंजयेश्वर मंदिरा समोर, कोथरुड, पुणे.
५. भगत ट्रेडर्स, सिंहगड रोड, अभिरुची मॉल समोर, पुणे
६. जगदीश ट्रेडिंग कंपनी, वैभव टॉकीज मागे, महेश सहकारी बँकेशेजारी, हडपसर
७. कुवाड कोठारी सप्लाय कंपनी, विठ्ठल मंदिरजवळ, कर्वेनगर, पुणे-५२
८. व्हि. एन. एंटरप्राईजेस, ८१, अभिनव सोसा., सहकारनगर नं. १, पद्मावती मंदीराजवळ, पुणे.
९. अर्बन बाझार, माणिक बाग, हॉटेल ब्रम्हवेद जवळ, सिंहगड रोड, पुणे
१०. पवन ट्रेडर्स, समृध्दी मार्केट, संघर्ष चौक, दु. नं. २२, चंदननगर, पुणे
११. श्री वर्धमान जैन श्रावक संघ, श्री वर्धमान जैन स्थानक भवन, विवेकनगर, आकुर्डी पुणे
१२. अॅड. योगेश संतोष जैन, खडकी कॉन्टामेंट हॉस्पीटल जवळ, खडकी बाझार, पुणे
१३. दि पूना टिंबर मर्चटस् अॅन्ड सॉ मिल ओनर्स असो., न्यू टिंबर मार्केट (टिंबर भवन), पुणे
१४. श्री. सुरेंद्र कुलकर्णी, द्वारा स्पास टुर्स, संभाजीनगर, चिंचवड
१५. न्यू पूना बेकरी, नांदेड सिटी, फ्लॅट नं. ५९, सिंहगड रोड, पुणे
१६. अन्नपूर्णा जैन सेवा, वडगांव शेरी, पुणे
१७. डायमंड सोशल अॅक्टिव्हिटी, श्री हॉस्पिटलजवळ, खराडी, पुणे
१८. श्री. शिरीष बोधानी, कमला नेहरु पार्क, एरंडवणा, पुणे.
१९. स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान, दिव्यांग कल्याणकारी शिक्षण संस्था, वानवडी, पुणे
२०. हिंदमाता तरुण मंडळ, २६४, नाना पेठ, पुणे
२१. श्री. किरणसिंह राजपुरोहित, कात्रज कोंढवा रोड, पुणे
२२. अरिहंत प्रोव्हिजन स्टोअर्स, चिंतामणी चौक, वाल्हेकरवाडी, चिंचवड, पुणे.
२३. के. सी. फुडस्, ३/३बी, रास्ता पेठ, इंद्रप्रस्थ सोसायटी समोर, अपोलो थेटर जवळ, पुणे

Post a Comment
0 Comments