Type Here to Get Search Results !

हडपसरमध्ये अभूतपूर्व उत्साह, एकनाथ शिंदे साहेबांच्या उपस्थितीने भव्य रास दांडियाला रेकॉर्डब्रेक गर्दी..!!

 


मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे 

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार 


पुणे ..प्रतिनिधी...

महाराष्ट्राचे भाग्यविधाते, राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षाचे मुख्य नेते लोकनेते माननीय एकनाथ शिंदे साहेब हडपसरमध्ये स्वर्गीय गंगुबाई संभाजी शिंदे नवरात्री उत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून आले आणि पुणेकरांच्या उत्साहाला अक्षरशः उधाण आले.


नवरात्र उत्सव हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जतन करणारा, परंपरेचे दर्शन घडवणारा महापर्व मानला जातो. ठाण्याच्या धरतीवर जसा भव्य नवरात्रोत्सव साजरा होतो, तसाच पुण्यातील या उत्सवाने आपल्या वैभवाचा ठसा उमटवला. “महाराष्ट्र खऱ्या अर्थाने सणांचे माहेरघर आहे,” असा भावपूर्ण उल्लेख करत साहेबांनी दिलेले उत्स्फूर्त भाषण ऐकून संपूर्ण पुणेकर भारावून गेले.



साहेबांच्या उपस्थितीमुळे रास दांडियाच्या मैदानावर अभूतपूर्व गर्दी उसळली. नागरिकांनी गर्दीचा महासागर निर्माण करत उत्सवाला अविस्मरणीय बनवले. लोकांचा उत्साह एवढा प्रचंड होता की हडपसर परिसर उत्सवाच्या रंगात न्हाऊन निघाला. पारंपरिक पोशाखातील तरुणाई, आनंदाने थिरकणाऱ्या महिला व पुरुष, वादनाचा गजर, रोषणाईने उजळलेले मैदान  या सगळ्या वातावरणाला एकनाथ शिंदे साहेबांच्या उपस्थितीने खऱ्या अर्थाने सुवर्णसिंचन केले.


हडपसरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आले की नागरिकांची गर्दी कशी ओसंडून वाहते, याचे जिवंत चित्रण या उत्सवात पाहायला मिळाले. हजारो लोकांच्या जयजयकारात साहेबांनी प्रवेश केला आणि क्षणातच संपूर्ण मैदान "एकनाथ शिंदे साहेबांच्या" नावाने दुमदुमले.



ही गर्दी एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रेमाचे, नवरात्रीसारख्या पवित्र पर्वाबद्दल असलेल्या श्रद्धेचे व साहेबांबद्दलच्या आत्मीयतेचे दृष्य होते. पुण्यातील नागरिकांनी इतिहास घडवणारी अशी उपस्थिती दाखवत स्वर्गीय गंगुबाई संभाजी शिंदे नवरात्री उत्सवाला भव्यतेच्या नव्या उंचीवर नेले.


Post a Comment

0 Comments