Type Here to Get Search Results !

जाचक जीएसटीतून मुक्तता करण्याचे श्रेय राहुल गांधींनाच' - माजी आमदार मोहन जोशी भर पावसात असंख्य कार्यकर्त्यांचा आभार कार्यक्रमात सहभाग

 


मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे 

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार 


पुणे : जातीय जनगणनेची मागणी असो, नोटाबंदीचा मुद्दा असो, एच-१बी व्हिसाचा प्रश्न असो किंवा आता जीएसटीचा जाच — प्रत्येक वेळी राहुल गांधीच आधी आवाज उठवतात आणि सरकारला जागे करतात.

📌 पुण्यातून राहुल गांधींनी सातत्याने जीएसटीचा मुद्दा मांडला. २०१७ पासून २०२५ पर्यंत सर्वसामान्य नागरिकांकडून झालेली कोट्यवधी रुपयांची लूट त्यांनी उघड केली. अखेर त्यांच्या सातत्यपूर्ण संघर्षामुळे जनतेला दिलासा मिळाला.

या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र साहित्य परिषद चौक, टिळक रोड, पुणे येथे विशेष आभार प्रदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष व माजी आमदार मोहनदादा जोशी यांनी यावेळी बोलताना सांगितले की –

“जीएसटीत बदल घडवून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचे श्रेय राहुल गांधींनाच द्यावे लागेल. मोदी सरकारने जनतेवर लादलेल्या गब्बर सिंग टॅक्सविरुद्ध राहुल गांधींनी सातत्याने आवाज उठवला. हजारो कोटी रुपयांच्या लुटीबद्दल प्रश्न विचारून जनतेचा आवाज बनले. आज जीएसटीतून मिळालेली मुक्तता ही त्यांच्या संघर्षाचीच देण आहे.”

✊ फलकावरील घोषणा

कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी हातात फलक घेतले होते. त्यावर – “झुकता है नरेंद्र मोदी, जब बोलता है राहुल गांधी”, “गब्बरसिंग टॅक्स हटवल्याबद्दल राहुल गांधींना आभार”, “जीएसटीतून मुक्तता – श्रेय राहुल गांधींना आणि काँग्रेसलाच”, “जातीनिहाय जनगणनेला मंजुरी – राहुल गांधींमुळे”, “जीएसटीतून मुक्तता, आता पाळी मत चोरीची” अशा घोषणा लिहिलेल्या होत्या.



🛑 मोदी सरकारवर टीका

मोदी सरकारने जीएसटी आणताना पाच स्लॅब लादले होते. त्यावेळीच राहुल गांधींनी याला “गब्बरसिंग टॅक्स” असे नाव देत तीव्र टीका केली होती. काँग्रेसने सुचविलेल्या जीएसटीमध्ये फक्त दोनच स्लॅब होते आणि जीवनावश्यक वस्तू त्यातून वगळलेल्या होत्या. मात्र मोदी सरकारने मनमानी करून जाचक कर प्रणाली लागू केली आणि जनतेची ८ वर्षे लूट केली, असा आरोप मोहन जोशी यांनी यावेळी केला.

👥 कार्यक्रमात उपस्थित मान्यवर व कार्यकर्ते

भर पावसातही असंख्य कार्यकर्त्यांनी ठामपणे सहभाग नोंदवला. त्यामध्ये – संजय बालगुडे, सुनील मलके, प्रशांत सुरसे, सौरभ अमराळे, प्रथमेश आबनावे, यशराज पारखी, स्वाती शिंदे, चेतन अगरवाल, आयुब पठाण, सुरेश कांबळे, प्रवीण करपे, शाबीर खान, भोला वांजळे, संकेत गलांडे, हसीना सय्यद, इंद्रजीत केंद्रे, गोरख पळसकर, अश्पाकभाई शेख, अनिकेत सोनावणे, अक्षय कांबळे, विकास सुपनार, मंगेश थोरवे, महेश विचारे, राजेश अल्हाट, महेंद्र चव्हाण, अविनाश राठोड, गणेश उबाळे, बाबा शिरसागर, महेश हराळे, विशाल मलके, अनिल आहेर आदी कार्यकर्त्यांचा सहभाग होता.

कळावे,


 

Post a Comment

0 Comments