मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार
पुणे..प्रतिनिधी....
पुणेकरांचे स्वप्न साकार – सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचे लोकार्पण
महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते सिंहगड रस्त्यावरील स्वामिनिष्ठ शिवरक्षक वीर शिवाजी काशीद चौक ते विनोदमुर्ती कै. प्रकाश विठ्ठल इनामदार चौक पर्यंतच्या उड्डाणपुलाचे उदघाटन झाले.
या लोकार्पण सोहळ्याला केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मा मुरलीधरअण्णा मोहोळ, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे, राज्यमंत्री मा माधुरीताई मिसाळ, आमदार योगेशअण्णा टिळेकर, शहराध्यक्ष धीरजजी घाटे यांच्यासह अनेक मान्यवर, भाजपा पदाधिकारी, स्थानिक नगरसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments