मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार
पुणे इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज च्या वतीने पालखी सोहळा व ग्रंथदिंडीचे आयोजन ................
पुणे दि.५- विद्यानगर येथील पुणे इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या वतीने विद्यानगर परिसरात ग्रंथदिंडी काढण्यात आली. या दिंडीमध्ये शिक्षणाचे महत्त्व प्रत्येक वर्गात जाऊन सांगण्यात आले साधारण ३00 विद्यार्थ्यांनी या ग्रंथ दिंडीमध्ये सहभाग घेतला. टाळ मृदुंगाच्या व ज्ञानोबा माऊली तुकाराम या गजराने शाळेभोवतील परिसर दुमदुमून गेला.
वारकरी व विठ्ठल रुखुमाईची वेशभूषा केलेले विद्यार्थी यांनी दिंडीमध्ये फुगडी , भजन ,गायन ,व इतर खेळ खेळत होते .शाळेच्या उपाध्यक्ष ऍड. रेणुका चलवादी , प्राचार्य स्मिता लोंढे , उपप्राचार्य अश्विनी मोहिते व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले .


Post a Comment
0 Comments