मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार
नवनिर्वाचित पुणे महानगर पालिका आयुक्त #नवल_किशोर_राम यांचे सन्मानपूर्वक स्वागत..!!
अलीकडेच नवनिर्वाचित पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेऊन स्वागत करण्यात आले. या प्रसंगी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या कादंबरीसह पुष्पगुच्छ देऊन त्यांचे मनापासून स्वागत करण्यात आले.
या वेळी माजी गृहराज्यमंत्री रमेशदादा बागवे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते जयवंत किराड, मा नगरसेवक मा अविनाशजी बागवे, पुणे शहर काँग्रेस कमिटी इंटकचे अध्यक्ष चेतन अग्रवाल, शिक्षण मंडळाचे माजी उपाध्यक्ष मा नुरुद्दिन सोमजी, जेधे फाउंडेशनचे मा कान्होजी जेधे, मातंग एकता आंदोलन राज्य समन्वयक विठ्ठलराव थोरात, मातंग एकता आंदोलनाचे अध्यक्षा राजश्री अडसूळ, मा अरूणजी गायकवाड सेक्रेटरी महा राज्य,तसेच सोशल मिडिया अध्यक्ष मा सुनिलजी बावकर, राहुलजी चिंदम, कसबा ब्लॉक चे माजी अध्यक्ष प्रवीण नाना करपे यांसह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमात साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाबाबत चर्चा झाली तसेच पुणेरी पगडी व अण्णा भाऊ साठे यांचे अप्रकाशित साहित्यही भेट म्हणून दिले गेले, जे समाजाच्या भाविष्याला नवे मार्ग दाखवणारे ठरणार आहे.
या सर्व उपस्थितीमुळे कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित झाला. पुणे शहराच्या विकासासाठी आणि सामाजिक न्यायासाठी अशा सहकार्याची अपेक्षा.
नवनिर्वाचित आयुक्त नवल किशोर राम यांना शुभेच्छा दिल्या.
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳


Post a Comment
0 Comments