Type Here to Get Search Results !

कोल्हापुर येथे होणाऱ्या गोलमेज परिषदेचे "उद्घाटक" म्हणून माजी मंत्री 'मा. रमेश दादा बागवे' यांची निवड..!!!

 


मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार


      अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या प्रश्नावर कोल्हापूर येथे होणाऱ्या गोलमेज परिषदेचे "उद्घाटक" म्हणून मातंग समाजाचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री मा. रमेश दादा बागवे यांची निवड करण्यात आली आहे. तर या परिषदेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत आणि संशोधक  प्रा. डॉ. बी. एस. वाघमारे ( छत्रपती संभाजी नगर ) यांची अध्यक्ष म्हणून यापूर्वीच निवड जाहीर करण्यात आली आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती निमित्त गुरुवार, दिनांक 26 जून 2025 रोजी कोल्हापूर येथे ही गोलमेज परिषद संपन्न होत आहे.

        रमेश दादा बागवे हे 2004 ते 2014 या कालावधीमध्ये विधानसभेचे आमदार म्हणून निवडून आले होते. महाराष्ट्राचे गृह, तुरुंग, अन्न आणि औषध तसेच उत्पादन शुल्क राज्य मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम करत असताना नक्षलग्रस्त भागामध्ये त्यांनी केलेले काम अत्यंत उल्लेखनीय मानले जाते. पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून 23 वर्ष त्यांनी कार्य केले असून पुणे महानगरपालिकेचे सभागृह नेते आणि स्थायी समितीचे सभापती म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. मातंग एकता आंदोलन या संघटनेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी महाराष्ट्रभर मातंग समाजाचे संघटन केले आहे. सर्वांना बरोबर घेऊन जाणारे आणि सामाजिक प्रश्नांची जाणीव असणारे धाडसी आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची महाराष्ट्रात ख्याती आहे. 

       मा. रमेश दादा बागवे यांची गोलमेज परिषदेचे उद्घाटक म्हणून निवड झाल्याबद्दल महाराष्ट्रातील मातंग समाजातर्फे व संयोजकांच्या वतीने आपले हार्दिक अभिनंदन..!!!


Post a Comment

0 Comments