मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे
अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार
मुंबई दि. 17 जून, 2025 :- विधानभवन, मुंबई येथे भटक्या विमुक्त आदिवासी संयोजन समितीच्या 65 सदस्यीय शिष्टमंडळाने आज उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची भेट घेऊन विधीमंडळ कामकाजाची सविस्तर माहिती घेतली.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्रीमती मुमताज शेख यांनी केले. त्यांचे संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या प्रशिक्षण सत्रातील सहभागी प्रतिनिधींचा सत्कार डॉ.नीलम गोऱ्हे, उपसभापती, महाराष्ट्र विधानपरिषद यांचे हस्ते यावेळी करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सन 1992-1993 पासून भटक्या विमुक्तांसाठी केलेल्या कार्याच्या आठवणींना उजाळा दिला. भटक्या विमुक्तांनी संविधानातून मिळालेले सर्व हक्क, मुलभूत सुविधा, आरक्षण, शिष्यवृत्ती व शासनाच्या लाडकी बहिणसारख्या योजनांचा लाभ घेऊन स्वत:चे, कुटुंबाचे व समाजाचे सक्षमीकरण करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्री.निलेश मदाने, जनसंपर्क अधिकारी, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय यांनी केले. कार्यक्रमास श्रीमती मुमताज शेख, श्रीमती ललीता धनवरे, ॲड.अरुन जाधव, श्री.शरद बराथे, श्रीमती उमा जाधव, श्री.विनोद पवार, श्रीमती भावना वाघमारे, श्रीमती स्वाती खंडागळे, श्रीमती पपिता माळवे, श्रीमती प्रिर्यदर्शनी जाधव, श्री.हजरत अली सोनीकर, श्रीमती रजनी पवार, श्री.बाबुसिंग पवार, श्री.अप्पाराव राठोड आदींची उपस्थिती लाभली.



Post a Comment
0 Comments