Type Here to Get Search Results !

गडा इलेक्ट्रॉनिक्स’ गेमची 10 million डाऊनलोड्सची विक्रमी मजल; ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’च्या डिजिटल विश्वाला मिळाली नवी उंची

 


मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार


मुंबई, १३ जून २०२५ — देशातील लोकप्रिय विनोदी मालिकेच्या विश्वातून साकारलेला मोबाईल गेम ‘गडा इलेक्ट्रॉनिक्स’ने तब्बल 10 million डाऊनलोड्सचा टप्पा पार केला आहे. Android Play Store आणि iOS App Store वर मिळून हा गेम इतक्या मोठ्या संख्येने डाऊनलोड झालेला पहिला भारतीय स्वतंत्र गेम स्टुडिओचा गेम ठरला आहे.


‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतील ‘जठालाल’चा प्रसिद्ध गॅजेट शोरूम—‘गडा इलेक्ट्रॉनिक्स’—या पार्श्वभूमीवर आधारित असलेला हा idle arcade simulation गेम वापरकर्त्यांना स्वतःचा व्यवसाय उभारण्याचा आणि वाढवण्याचा अनुभव देतो. या गेमने Play Store आणि App Store या दोन्ही ठिकाणी उच्च रेटिंग्स मिळवत लोकप्रियतेचा नवा उच्चांक गाठला आहे.


या यशाबद्दल नीला मीडियाटेकचे संस्थापक असित कुमार मोदी म्हणाले, “हे यश केवळ आकड्यांचं नाही, तर प्रेक्षकांच्या आपल्या पात्रांवरील भावनिक नात्याचं प्रतीक आहे. आम्हाला अभिमान वाटतो की भारतीय IP विश्वातील एक गेम आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धा करू शकतो. 10 million डाऊनलोड्सचा टप्पा संपूर्ण भारतीय गेमिंग उद्योगासाठी एक ऐतिहासिक क्षण आहे.”


हरजीत छाब्रा, CEO, नीला मीडियाटेक, म्हणाले, “या गेमसाठी चांगला retention आणि in-app purchase दिसून येत आहे. अनेक आंतरराष्ट्रीय प्रकाशक या गेमबाबत रस दाखवत आहेत. येत्या १८ ते २४ महिन्यांत ‘गडा इलेक्ट्रॉनिक्स’चा अंदाजे ₹२०० कोटींच्या मूल्यात वाढ होण्याचा अंदाज आहे. या यशाच्या बळावर आम्ही आणखी काही TMKOC आधारित गेम्स विकसित करत आहोत—पोपटलालच्या गुप्तहेरगिरीवर आधारित गेम, रोशनच्या गॅरेजवर आधारित गेम आणि माधवीच्या पापड-पिकल्स व्यवसायावर आधारित सिम्युलेशन गेम लवकरच येणार आहेत.”


Post a Comment

0 Comments