सोशल हॅन्डस फाउंडेशन यांची नवीन कार्यकारणी कमिटी स्थापन*
शालेय- उच्च शिक्षण गरिबीतून खडतर प्रवास करून स्वतःच्या पायावर उभा राहिलेल्या व समाजासाठी वाहून घेतलेल्या
सोशल हॅन्ड फाउंडेशन या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 27 एप्रिल 2025 रोजी बारामती तालुका जिल्हा पुणे येथे संपन्न झाली या सर्वसाधारण सभेला बारामती विभाग , सातारा विभाग, पुणे विभागातील सर्व सभासद व इतर विभागातून विविध पदाधिकारी उपस्थित होते यादरम्यान मागील कार्यकारी मंडळ यांचे राजीनामे स्वीकारण्यात आले. व ते सर्वानुमते मंजूर करण्यात आले. त्यानंतर बैठकीमध्ये सर्व सभासदांच्या विचारांअंती नवीन कार्यकारी कमिटी स्थापन करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष माननीय मदन दळे, उपाध्यक्ष अजित जगदाळे, सचिव जितेंद्र मोरे, खजिनदार सुदर्शन जाधव यांची निवड करण्यात आली त्याचबरोबर बापू धेंडे ,सचिन शिंदे, संतोष एकतपुरे, दत्तात्रेय वायसे, संदीप सावर्डेकर, फिरोज मेटकरी यांना कार्यकारी मंडळात समाविष्ट घेण्यात आले, विलास गवळी यांच्याकडे बारामती विभाग, सांस्कृतिक विभागाची संयुक्त जबाबदारी देण्यात आली
सदर कार्यक्रमास संस्थेसाठी सचिव पदी राहिलेले अमोल गोरे, सचिन आडागळे तसेच माननीय डी एन मगदूम . पी.एन साठे सर, डी.व्हि.भोसले सर इत्यादी सल्लागार , ऑडिटर भसमे सर मंडळ उपस्थित होते
माझी प्राचार्य डी एन मगदूम सरांनी संस्थेची इथून पुढे भविष्यातील वाटचाल कशी असावी, समाजातिल विविध प्रश्न एकजुटीने येऊन मार्गस्थ कसे लावावेत ते नमूद केले.
सदर सभेस बारामती मधील दीपक लीमगिरे अमोल भोसले संदीप भोसले राजेंद्र माळशेकर इत्यादी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सर्व नियोजन, व मिष्टान्न भोजन ची व्यवस्था बारामती विभाग चे विलास गवळी यांनी पार पाडली
कार्यक्रमाच्या शेवटी सचिन आडागळे यांनी सर्वांचे आभार मानले आणि कार्यक्रम संपला असे जाहीर केले
.jpg)
Post a Comment
0 Comments