Type Here to Get Search Results !

पावसात उघड झाला रस्ते बांधकामातील भ्रष्टाचाराचा चेहरा; भवानी पेठ व बाहुबली चौकात रस्ते खचले...

 


मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे

अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार


पुणे.....प्रतिनिधी....

पुण्यात झालेल्या पहिल्याच पावसात भवानी पेठ, बाहुबली चौक, आणि आसपासच्या भागात नुकत्याच बांधलेल्या रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. गेल्या महिन्यात महानगरपालिकेने कोट्यवधी रुपयांचा खर्च करून या भागातील रस्ते दुरुस्त केले होते. मात्र, एकाच पावसात रस्ते खचून पडल्यामुळे बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

स्थानिक नागरिकांनी याबाबत भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी मा. किसान दगडखैर साहेब यांच्याकडे तक्रार नोंदवली आहे.




तक्रारीत म्हटले आहे की, जनतेच्या पैशातून अशा निकृष्ट दर्जाचे काम करून त्याची चेष्टा करण्यात आली आहे. हे थांबले पाहिजे. यावेळी तातडीने या तक्रारीची दखल घेत खड्डे बुजविण्याचे काम सुरु केले. यावेळी माझ्यासह मा. रवी अप्पा पाटोळे, मा. धनराजजी खंडाळे, राजू जी थोरात, श्री. भोंडे, सुनिलजी बावकर, हुसेन शेख, थोरातजी, व  ईतर यावेळी उपस्थित होते. यावेळी या तक्रारी नंतर पथ विभाग व त्यांच्या टीम ने त्वरित सहकार्य केले यासाठी त्यांचे आभार व्यक्त केले.



परंतु  ज्या भ्रष्ट ठेकेदार आणि अधिकारी ज्यांनी नागरिकांच्या कररूपी पैशांची उधळपट्टी केली, त्यांच्या वर कडक कारवाही झालीच पाहिजे अशी भावना नागरिकांची आहे, तसेच ज्यांनी मोठे मोठे फलक लावले, की.... "हमारा काम बोलता है." या अशा खोट्या प्रसिद्धीला निसर्गच उत्तर देऊन " या तुम्हारा भ्रष्टाचार बोलता है और सबको दिखता भी है".. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे


🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

Post a Comment

0 Comments