Type Here to Get Search Results !

समाविष्ट गावांतील कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण बैठक... पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांतील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना महापालिकेत समाविष्ट करून घेण्याच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक मंत्रालयात नगरविकास विभाग राज्यमंत्री मा. माधुरीताई मिसाळ यांच्या दालनात पार पडली.



अधिकृत पोर्टल दैनिक भारत विचार

मुख्य संपादक प्रो श्री दत्ता सुखदेव हजारे

मुंबई ..


समाविष्ट गावांतील कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण बैठक...


पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांतील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना महापालिकेत समाविष्ट करून घेण्याच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक मंत्रालयात नगरविकास विभाग राज्यमंत्री मा. माधुरीताई मिसाळ यांच्या दालनात पार पडली.


या बैठकीत कर्मचाऱ्यांना सेवा, वेतन संरचना, भविष्य निर्वाह निधी आणि इतर प्रशासकीय बाबींची सुविधा मिळावी याबाबत चर्चा केली. कर्मचाऱ्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे सेवा बजावली असून त्यांचा न्याय आणि हक्क निश्चित व्हावा, अशी भूमिका मांडली. सदर बैठकीला संबंधित नगर विकास विभागातील अधिकारी उपस्थित होते. 


Post a Comment

0 Comments